मेष : कराराची घाई नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात उतावळेपणाने विधान करू नये. मानसिक अस्वस्थता राहील. आपल्याला काही अनावश्यक ताण-तणावाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. जास्त अपेक्षा ठेऊ नका. धंद्यात सुधारणा करण्याची संधी मिळेल. मनोबल व आत्मविश्वास कमी राहील. तुम्ही शांत राहणेच बरे राहील. व्यावसायिकदृष्टय़ा आतापर्यंत ठरवून ठेवलेले समीकरण जुळून येत नव्हते. सध्या हे समीकरण जुळून येणारे आहे.
वृषभ : नवीन परिचय वाढतील. तुमच्या क्षेत्रात नवे शिकायला मिळेल. आपल्याला आर्थिक लाभ होणार आहेत. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. नोकरीच्या ठिकाणी सौम्य धोरण ठेवा. कुठेही अपेक्षा करू नका. काहींना आपल्या सहकाऱ्यांशी हितगुज करता येणार आहे. आपल्या मुला-मुलींकरिता वेळ देऊ शकणार आहात. व्यवसायात भरभराट होईल. नोकरदार वर्गाला जादा कामाची जबाबदारी मिळेल. आर्थिक बाबतीत बचत करणे योग्य राहील.
मिथुन : कला, क्रीडा, साहित्यात प्रगती होईल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. आपला इतरांवर प्रभाव असणार आहे. दैनंदिन कामात सुयश लाभेल. धंद्यात पुढे जाल. आळस नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मानसन्मान मिळेल. मानसिकता सकारात्मक असणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. आर्थिकदृष्टय़ा आवक पाहून जावक ठरवा. व्यवसायातून मिळणारे उत्पन्न चांगले असेल. नोकरदार वर्गाचे कामकाज सुरळीत चालू राहील.
कर्क : अतिमहत्त्वाची कामे करून घ्या. नोकरीत बढती, बदली होईल. मानसिक प्रसन्नता लाभेल. चिंता कमी होतील. तुम्ही आपल्या नातेवाइकांना भेटाल. रसमज दूर करून नव्या दिशेने जाल. धंद्यात तणाव वाढवू नका. प्रवास सुखकर होणार आहेत. काहींना एखादा भाग्यकारक अनुभव येईल. मनोबल उत्तम राहील. आर्थिक विवंचना दूर होईल. राजकीय क्षेत्रात जोमाने काम कराल. जिवलग मित्र-मैत्रिणींची भेट होईल.
सिंह : सहनशीलता ठेवा तर प्रतिमा डागाळणार नाही. नोकरीत व्याप राहील. गैरसमज होतील. मानसिक स्वास्थ्य लाभणार नाही. विनाकारण धावपळ व पळापळ होईल. धंद्यात तणाव, खर्च जाणवेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात चौफेर सावध रहा. कामाचा ताण व दगदग जाणवणार आहे. आज आपण कोणत्याही गोष्टीचा विनाकारण विचार करू नये. नोकरदार वर्गाचा कामातील अंदाज खरा ठरेल. आर्थिकदृष्टय़ा आवक वाढेल. राजकीय क्षेत्रातील नियोजन परिपूर्ण यशस्वी होईल.
कन्या : सर्वत्र कायदा पाळा. वसुली करा. धंद्यात क्षुल्लक अडचणी येतील. मानसिक अस्वस्थता कमी होईल. कामे यशस्वी होणार आहेत. प्रवासाचे योग येणार आहेत. राजकीय, सामजिक क्षेत्रात क्षुल्लक व्यक्तीलासुद्धा कमी समजू नका. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. काहींना आपले विचार स्पष्टपणे मांडण्याची संधी मिळेल. आर्थिक बाबतीत व्यवहार करताना काळजी घ्या. राजकीय क्षेत्रातील घडामोडींचा आढावा घेताना शब्द जपून वापरा.
तुळ : नोकरीत गैरसमज. धंद्यात हिशेबात लक्ष द्या. वसुलीचा प्रयत्न करा. अनावश्यक कामात आपला वेळ वाया जाईल. मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे. थकबाकी मिळवा. कल्पनाशक्तीला चालना देणारी घटना मिळेल. काही बाबतीत तुमचे मन नाराज असणार आहे. काहींना आरोग्याच्या तक्रारी सतावणार आहेत. नोकरदार वर्गाने कामात व्यस्त राहिलेले चांगले. खर्च जपून करा. राजकीय क्षेत्रात रोखठोक भूमिका टाळा.
वृश्चिक : धंद्यात सुधारणा करण्याची संधी मिळेल. भावनेच्या आहारी जाऊ नका. मानसिक प्रसन्नता लाभेल. दैनंदिन कामास विलंब लागला तरी कामे पूर्ण होणार आहेत. राजकीय, सामाजिक क्षेत्रात जवळच्या व्यक्ती त्रास देतील. कायद्याला धरून वागा. व्यवसायातील तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. आर्थिकदृष्टय़ा व्यवहार करताना भावनिक गोष्टी टाळा. समाजमाध्यमांचा वापर न केलेला चांगला.
धनु : प्रगतीची संधी मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात बोलण्याचा गैरअर्थ काढण्याचा काही व्यक्ती प्रयत्न करतील. तुमचे मन आनंदी व आशावादी असणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण करू शकणार आहात. प्रतिष्ठा जपता येतील. कौटुंबिक वाटाघाटीचा प्रश्न सोडवावा लागेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. नोकरदार वर्गाला कामात पूर्णपणे लक्ष केंद्रित करावे लागेल. खर्चाची बाजू सांभाळा.
मकर : धंद्यात वाद नको. लाभ वाढेल. खरेदी विक्रीत लाभ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात बरोबर अंदाज येतील. जिद्दीने कार्यरत राहाल. प्रवासाचे योग येतील. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला जाणवत असणाऱ्या अडचणी कमी होणार आहेत. नवे डावपेच आखा. योजना पूर्ण करा.काहींना अनपेक्षित धनलाभ होईल. नातेवाईक भेटतील. आर्थिक नियोजन मार्गी लागेल. संततीचे लाड पुरवाल. घरगुती वातावरण चांगले राहील.
कुंभ : कुणालाही कमी समजू नका. तुमच्या क्षेत्रात मोठे यश मिळेल. कौटुंबिक जीवनात एखादी आनंददायी घटना घडेल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. प्रवासात घाई नको. कठीण प्रश्न सोडवा. कामाची प्रशंसा होईल. काहींना अचानक धनलाभ होईल. तुमच्या प्रियजनांसाठी तुम्ही वेळ देऊ शकाल. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. आर्थिक बाबतीत समाधानाची बाब असेल. राजकीय क्षेत्रात महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा होईल.
मीन : धंद्यात यांत्रिक खर्च होईल. नवे काम मिळेल. दिग्गज व्यक्तींचा परिचय प्रेरणादायक ठरेल. तुमचे मनोबल वाढणार आहे. गेले दोन दिवस असणारी अस्वस्थता कमी होणार आहे. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकणार आहात. राजकीय, सामाजिक क्षेत्रात पद, अधिकार लाभेल. काहींना दैनंदिन कामात सुयश लाभणार आहे. नवीन व्यवसायाची सुरुवात होईल. नोकरदार वर्गाला नवीन कामाचा प्रस्ताव येईल. आर्थिक दृष्टय़ा प्रगती होईल.