मेष : आज थोडा आळशीपणा वाढेल, परंतु काम करायचं मनाशी ठरवलंत तर नक्कीच कराल.महत्त्वाची कामे दुपारपर्यंत करावीत. दुपारनंतर मनोबल कमी राहील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. प्रवास नकोत. वाहने जपून चालवावीत. आज आपणाला दैनंदिन कामात अडचणी जाणवणार आहेत. दगदग व त्रास होईल. कुटुंबात शुभवार्ता यांचा ओघ चालू राहील. एखादी महत्त्वाची सकारात्मक घटना घडल्यामुळे पती अथवा पत्नीचा भाग्योदय होईल.
वृषभ : परदेश रमणाचे बेत आखले असतील तर तसा प्रयत्न करायला हरकत नाही. नोकरी, व्यवसायातील आर्थिक कामे दुपारनंतर होतील. महत्त्वाच्या गाठीभेटी पडतील. राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढेल. आर्थिक लाभ होतील. दुपारनंतर अनपेक्षितपणे प्रियजन भेटणार आहेत. कामाचा ताण कमी होईल. कुटुंबातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्याचे समाधान लाभेल. आपल्या तसेच कुटुंबीयांच्या हौसेखातर खर्च करू शकाल.
मिथुन : महिलांचा मौजमजा करण्याचा मूड राहील. दिवस आनंदात जाईल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. तुमचा प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील. जिद्द व चिकाटी वाढेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. भाग्यकारक अनुभव येतील. काहींना मानसन्मान लाभेल. तुम्ही आपली मते इतरांवर लादणार आहेत. अतिआत्मविश्वास घातक ठरू शकतो हे लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे व्यवसाय-धंद्यात स्पर्धेत यांवर विजय मिळविण्याच्या नादात चुकीच्या मार्गांचा अवलंब करू नका.
कर्क : तुमच्या मनातले इतरांना लवकर समजणार नाही. थोडी अस्थिर आणि चंचल मनोवृत्ती राहील. दुपारनंतर तुमचे मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी घटना घडेल. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामातील अडचणी दुपारनंतर कमी होतील. प्रवासात काळजी घ्यावी. चालू नोकरीत आपल्या कामाचे कौतुक होऊन प्रशंसेस पात्र ठरेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी स्वीकारावी लागेल. तसेच सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळत राहील.
सिंह : कोणत्याही निर्णयांमध्ये खंबीरपणा ठेवावा लागेल. दुसऱ्याचे न ऐकण्याची वृत्ती राहील. दुपारनंतर मानसिक अस्वस्थता राहील. आरोग्य सांभाळावे. प्रवासात व वाहने चालविताना काळजी घ्यावी. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. काहींना एखाद्या मनस्तापदायक घटनेला सामोरे जावे लागेल. मनोबल कमी राहील. पदोन्नती वेतन वृद्धी सारख्या घटना घटित होतील. अधिकार क्षेत्रात वृद्धी होऊन अधिकारात ही वाढ होईल.
कन्या : आज इतरांचे तुमच्याबद्दल गैरसमज होण्याची शक्यता आहे. दुपारनंतर तुमचे मनोबल वाढेल. दैनंदिन कामे तसेच इतर महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. प्रवास होतील. खर्चाचे प्रमाण वाढेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. कामाचा ताण कमी होईल. आत्मविश्वासाने आपले मत मांडा. आपले म्हणणे इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. विद्यार्थ्यांना गुरुजनांची तसेच कुटुंबातून मार्गदर्शनासह मदत मिळेल.
तुळ : आज तुमचा राग तुमच्या ताब्यात राहणार नाही,ज्यांना रक्तदाबाचा विकार आहे त्यांनी काळजी घ्यावी. दुपारनंतर अनावश्यक खर्च संभवतात. मनोबल कमी राहील. वाहने सावकाश चालवावीत. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. संततिसौख्य लाभेल. कामाचा ताण वाढणार आहे. अनावश्यक कामात वेळ जाईल. मानसिक ताणतणाव राहतील. नवीन करार मदार होऊन काही फायद्याचे सौदे हाती येतील. परदेशी व्यापार व्यवसाय संबंधित नाती प्रस्थापित होऊ शकतात.
वृश्चिक : जुने ते सोने याला चिटकून बसाल,परंतु नावीन्याकडे झेप घेण्याचे आकर्षणही राहील. नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे दुपारपूर्वी करावीत. मानसिक प्रसन्नता लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील. मनोबल उत्तम राहील. आध्यात्मिक प्रगती होईल. उत्साही राहाल. तुमच्या कामाने अनेक जण प्रभावित होणार आहेत. आनंदी घटना घडेल. व्यवसाय-धंद्यात कामगारांविषयी समस्या उत्पन्न होऊ शकतात. तसेच घेतलेल्या निर्णयांमध्ये फेरबदल करावे लागतील.
धनु : नोकरी करणाऱ्यांना नेहमीपेक्षा वेगळे काम हाताळण्याची संधी मिळेल. जिद्दीने कार्यरत राहाल. आरोग्य उत्तम राहील. महत्त्वाच्या कामात सुयश लाभेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. अनेकांचे सहकार्य लाभेल. कामाचा ताण असला तरी कामे उरकणार आहेत. प्रवास सुखकर होणार आहेत. आयात-निर्यातीच्या क्षेत्रात नेत्रदीपक यश मिळू शकते. व्यावसायिक तेजीमुळे व्यवसायात नवीन संकल्पनांचा वापर करू शकाल.
मकर : व्यवसायात आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्यायला लागेल. आर्थिक कामे दुपारपूर्वी करावीत. आरोग्य उत्तम राहील. प्रवास होतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. कौटुंबिक जीवनात स्वास्थ्य व समाधान लाभणार आहे. आरोग्य उत्तम राहणार आहे, मनोबल व आत्मविश्वास वाढेल. कुटुंब परिवारातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला फलद्रूप होईल. आर्थिक लाभ होतील. व्यवसाय, धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहील.
कुंभ : महिलांना स्वभावाला मुरड घालावी लागेल. कोणतीही आर्थिक घडामोड आज नको. महत्त्वाची आर्थिक कामे दुपारनंतर करावीत. तुमचा प्रभाव वाढेल. अनेक कामात सुयश लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. प्रवासाचे योग येणार आहेत. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकणार आहात. कुटुंबातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून त्यांच्या प्रगती उत्तर वार्ता कानी आल्यामुळे कुटुंब परिवारात आनंदाची लहर येईल.
मीन : महत्त्वाच्या कामाबाबत तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कुटुंबात इतरांच्या लहरी स्वभावाला तोंड द्यावे लागेल. दुपारनंतर मानसिक अस्वस्थता कमी होईल. उत्साह वाढेल. प्रवास होतील. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. तुमच्या कामाची उचित दखल घेतली जाईल. कुटुंबातील सदस्यांकडून तसेच मित्रमंडळींच्या वर्तुळातून अपेक्षित सहकार्य मिळेल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील.