धरणगाव (प्रतिनिधी) महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे ९ वी आणि १० वीच्या विद्यार्थांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. कोरोनाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आज ८ डिसेंबर पासून शासनाच्या कोविड-१९ नियमावलीचे पालन करून ९ वी व १० वीचे वर्ग पूर्ववत सुरू करण्यात आले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे संपूर्ण जग थांबलं होतं. आता हळूहळू सर्व पूर्वपदावर येतांना दिसत आहे. अशा परिस्थितीत आज ८ डिसेंबर पासून ९ वी आणि १० वी चे वर्ग सुरू करण्याबाबत शासनाचे निर्देश प्राप्त झालेत. या आधीच सर्व विद्यार्थांचे संमती पत्र भरून घेण्यात आले होते. त्यानुसार आज सॅनिटायझिंग, कम्पलसरी मास्क, सोशल डिस्टनसिंग, थर्मल स्कॅनिंग, ऑक्सीमीटर या सर्व गोष्टींचा पडताळा घेऊन विद्यार्थांना प्रवेश देण्यात आला. वर्गात देखील एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे नियोजन करून प्रत्येक बाकावर रोल नं. टाकण्यात आले. १२ : ०० ते २ : ४० दरम्यान ४० मिनिटांच्या ४ तासिका याप्रमाणे वर्ग घेण्याची सुरवात झाली. आज पहिल्या दिवशी विद्यार्थांच्या उपस्थिती वरून त्यांच्यातील उत्साह पहायला मिळाला.
विद्यार्थ्यांची मरगळ नाहीशी व्हावी व त्यांच्यात पुन्हा एकदा अभ्यासाची चांगली सुरवात व्हावी या उद्देशाने विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पंचायत समितीचे अधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका पी. आर. सोनवणे, पर्यवेक्षक जे. एस. पवार व सर्व शिक्षक बंधू भगिनी व कर्मचारी वृंद उपस्थित होते