नशिराबाद (सुनिल महाजन) येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यामंदिरात गुलाब पुष्प देऊन विद्यार्थांचे स्वागत करण्यात आले. सर्वप्रथम शालापूर्व तयारी दरम्यान सर्व वर्ग सॅनिटायजर करण्यात येऊन स्वच्छ करण्यात आले. तदनंतर सरस्वती मातेचे पूजन विद्यालयाची विद्यार्थिनी पूर्वा दिघे व प्रेम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष योगेश पाटील, मुख्याध्यापक सी बी अहिरे, प्रविण महाजन, पर्यवेक्षक बी आर खंडारे व सर्व शिक्षक उपस्थित होते. प्रथम दिवसाचे औचित्य साधून सर्व विद्यार्थांचे औक्षण करण्यात येऊन संस्थेचे कार्याध्यक्ष योगेश पाटील यांची कन्या संस्कृती पाटील च्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट व शालेय वस्तू भेट देण्यात आली. व शेवटी सर्व विद्यार्थ्यांचे हात सॅनिटायजर करून सर्वांना गुलाब पुष्प देऊन वर्गात प्रवेश देण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजन वैशाली भोळे व मंगला चौधरी यांनी केले. सदर कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले.