धरणगाव (प्रतिनिधी) येथील शतकोत्तरी पी. आर. हायस्कूल मध्ये शालेय शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार आज इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यात आले. ढोल ताशांच्या गजरात शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे शिक्षिकांनी आणि मुलींनी औक्षण करून स्वागत केले तर शाळेचे मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे, उपमुख्याध्यापक आर. के. सपकाळे आणि पर्यवेक्षिका आशा शिरसाठ यांनी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प आणि चाॅकलेट देऊन स्वागत केले.
प्रारंभी विद्यार्थ्यांची थर्मल स्कॅनींग व आॅक्सीमिटर द्वारे तपासणी करण्यात आली. हातावर सॅनिटायझर देऊन निर्जतुकीकरण करण्यात आले. विद्यार्थ्याच्या चेहर्यावर दहा महिन्यानंतर शाळेत आल्याचा आनंद ओसंडून वाहत होता. यावेळी शिक्षक डी. के. चौधरी, बी. डी. शिरसाठ, बी. सी. कोळी, एस. डी. मोरे यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना शाळेत घ्यावयाच्या काळजीबद्दल मार्गदर्शन केले.