फैजपूर (प्रतिनिधी) मित्रांसोबत सहलीला आलेल्या जळगावच्या २२ वर्षीय तरुणाचा यावल तालुक्यातील न्हावी बोरखेडा रस्त्यावरील मोर नदीच्या पात्रात कुराळ डोहात पोहत असताना बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळी घडली. दर्पण महेंद्र भोळे (वय २२, रा. जुना खेडी रोड जळगाव), असे मयत तरुणाचे नाव आहे.
दर्पण भोळे हा तरुण रविवार असल्याने गणेश मिस्त्री व विनीत पाटील या मित्रांसोबत मोर नदीपात्रातील कुराळ डोहानजीक सहलीला आला होता. त्याच्यासोबत न्हावी येथील काही तरुणही होते. सायंकाळी पाच वाजता दर्पण हा डोहाकडे गेला आणि पोहण्यासाठी उतरला. मात्र, त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. याबाबत गणेश पोपट मिस्तरी, वय२५, धंदा खाजगी नोकरी यांनी खबर दिली की, मेडीकल होलसेलर म्हणून भंगाळे डिस्टीब्यूटर जळगाव येथे खाजगी नोकरी करतो. मित्रा सोबत फिरायला गेलेले विनीत मुकुंद पाटील (रा. नवीन बसस्थान गांधी नगर, जळगाव) तसेच दर्पण महेंद्र भोळे हे एका मेडीकल होलसेलर म्हणून खाजगी नोकरी करीत होते. दर्पण हा पोहत असताना तो वर न आल्याने मित्रांनी शोध घेतला. मात्र, तोपर्यंत पाण्यात बुडून मृत्यु झाला होता.
याबाबत पुढील तपास स. पो. नी निलेश वाघ याच्या मार्गदशनाखाली पो हे कॉ राजेश बऱ्हाटे करीत आहे. दरम्यान, मोर नदीपात्रात असलेल्या कुराळ डोहाकडे निसर्गाचा आनंद घेण्यासाठी श्रावणात उत्साही तरुण नेहमी येत असतात. दरवर्षी या ठिकाणी अघटित घटना घडत असतात. त्यामुळे या ठिकाणी सहलीसाठी येऊ नये. आल्यास नदीत उतरु नये, असे आवाहन डीवायएसपी डॉ. कुणाल सोनवणे यांनी केले आहे.