उस्मानाबाद (वृत्तसंस्था) उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी शहरानजीक असलेल्या एका शेतात आकाशातून चक्क सोनेरी दगड पडल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास संबंधित शेतकरी आपल्या शेतात काम करत असताना, अचानक दोन किलो वजनाचा सोनेरी रंगाचा दगड प्रचंड खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निवृत्त माळी असं शेतकऱ्याचे नाव असून माळी आपल्या शेतीमध्ये काम करत असताना ही घटना घडली. खरंतर, उस्मानाबादमध्ये तुफान पाऊस झाला आहे. यामुळे शेतीची पाहणी करण्यासाठी गेले असता माळी यांच्यासोबत ही घटना घडली. घडलेल्या घटनेमुळे माळी खूप घाबरले होते. त्यांनी तातडीने तहसील कार्यालयात याची माहिती दिली.
सध्या दगडाची प्राथमिक तपासणी सुरू असून भारतीय भूवैज्ञानिक विभागाकडे पाठवण्यात आला आहे. तर यातून हा उल्कापात असल्याची माहिती भूवैज्ञानिकांकडून देण्यात आली आहे. दगडाचं वर्णन करायचं झालं तर ७ इंच याची लांबी असून ६ इंच रुंदी आहे तर वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार याची जाडी साडेतीन इंचापेक्षाही जास्त आहे.