चोपडा ( प्रतिनिधी) संपूर्ण हिंदुस्थानातील गुर्जर समाज आज एका वेगळ्या परिस्थितीतून जात आहे. गुजर नावात गुर्जर शब्द प्रचलित झाला पाहिजे. येणाऱ्या नव्या पिढीला समाजाची ओळख व्हावी म्हणून गुर्जर शब्द मागे पुढे लावला पाहिजे, या समाजात पूर्वापार उपनयन संस्काराची पद्धत होती, पण ती आज नष्ट झाली आहे ती सुरू करण्याची गरज आहे असे स्पष्ट प्रतिपादन अखिल भारतीय गुर्जर महासभेचे अध्यक्ष मा. नरेंद्र जी डेडा गुजर यांनी चोपडा येथे केले.
नारायणवाडी भागातील ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहात सर्व गुजर समाजाच्या ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवरांच्या पुढे बोलताना नरेंद्रजी पुढे म्हणाले की, गुर्जर समाजाने पूर्व इतिहासाचे अवलोकन केले पाहिजे, राजा मिहीर भोज यांच्या नावापुढे गुर्जर राजा असे लिहून चौका चौकात त्यांची प्रतिमा लावली गेली पाहिजे असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले, त्यांच्यासोबत आलेले अजब सिंग गुजर, मिठालाल गुर्जर, विजयसिंह गुजर, सतीश गुजर, डॉक्टर राहुल पाटील, भाजपा कार्यकर्ते लक्ष्मण पाटील, प्राध्यापक जेडी चौधरी सर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष, जयदेव देशमुख, चोपडे शहराचे माजी उपनगराध्यक्ष विकास भाऊ पाटील,
आदिना यावेळी गौरविण्यात आले. वि. के.पाटील, प्रकाश पाटील, योगेश चौधरी, सुधाकर चौधरी, नंदलाल चौधरी, मधुकर महाजन, मच्छिंद्र पाटील (भोरटेक) विनोद पाटील, सेवानिवृत्त पोलिस उपाधीक्षक पाटील, सुधाकर गुजर, अतुल शांताराम बडगुजर, सुखदेव पाटीलया सर्वांनी अतिथिसमोर आपला परिचय करून दिला. योगेश चौधरी यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले. सभेचे सूत्रसंचालन रमेश जे. पाटील यांनी केले. मान्यवरांचे स्वागत करताना त्यांनी आपला काव्यसंग्रह “नांगरफाळ”सत्कार दाखल भेट म्हणून दिला. ज्येष्ठ नागरिक संघाचे सरचिटणीस विलास पाटील यांनी गुर्जर दिशा”या साप्ताहिकाचे कॅलेंडर चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते केले.