नवी दिल्ली (वृत्तसंस्था) घरातील मोठे कार्य, मुलांच्या लग्न-शिक्षणासाठी पैसा हवा तर पगारदारांसाठी त्यांच्या भविष्यनिर्वाह निधी (Provident Fund) खात्यातील रक्कम मोठा आधार असतो. अडचणीच्या काळात तुम्ही तुमची पीएफची रक्कम काढू शकता. मात्र ही रक्कम काढताना अनेक नियम (Rules) असतात. तसेच पीएफ रक्कमसाठी योग्य ते कारण असायला हवं. जाणून घेऊयात पीएफमधील रक्कम कधी काढता येऊ शकते….
लग्नासाठी पीएफ खात्यातून किती रक्कम काढता येते?
तुम्हाला जर तुमच्या किंवा तुमच्यावर अवलंबून असलेल्या एखाद्या व्यक्तीच्या लग्नासाठी पैसे काढायचे असतील, तर तुम्ही पीएफ खात्यातून काही रक्कम काढू शकता. तुमच्या वतीने तुम्ही पीएफ खात्यामध्ये जेवढे पैसे जमा केले आहेत, त्याच्या ५० टक्के रक्कम ही तुम्हाला लग्नासाठी मिळू शकते. मात्र त्यासाठी तुम्ही कमीत कमी सात वर्ष तुमचा पीएफ कट होने आवश्यक आहे. मिळणाऱ्या पैशांमधून तुम्ही लग्नाचा खर्च करू शकता.
मुलाच्या शिक्षणासाठी पीएफची किती रक्कम मिळते?
तुम्हाला जर तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी पैशांची गरज असल्यास तुम्ही पीएफ काढू शकता. मुलांच्या शिक्षणासाठी तुम्हाला तुम्ही पीएफ म्हणून जमा केलेल्या रकमेच्या ५० टक्क्यांपर्यंत रक्कम मिळू शकते. मात्र यासाठी देखील तुम्ही सात वर्षांपेक्षा अधिक काळ नोकरीमध्ये असणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या शिक्षणासाठी किंवा मुलाच्या उच्च शिक्षणासाठी पीएफ खात्यामधून पैसे काढू शकता.
घर खरेदी करण्यासाठी
तुम्हाला सर्वाधिक पैशांची गरज कधी असते, ती म्हणजे घर खरेदी करताना. घर खरेदी करताना देखील तुम्ही तुमच्या पीए खात्यामधून पैसे काढू शकता. घर खरेदी करण्यासाठी तुम्हाल तुम्ही जमा केलेल्या रकमेमधील ५० टक्क्यांपर्यंत रक्कम मिळू शकते. मात्र त्यासाठी तुम्ही सलग ५ वर्ष नोकरी करणे आवश्यक आहे.