नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लसीबाबत देशाला उत्तर दिली पाहिजेत, असं राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधींनी ट्विटद्वारे नरेंद्र मोदी यांना चार प्रश्न विचारले आहेत. सर्व भारतीयांना कोरोना लस कधीपर्यंत दिली जाणार आहे? हा प्रश्नदेखील राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला.
कोरोनावरील लस बनवणाऱ्या कोणत्या कंपनीची निवड केली गेली आहे, पहिल्यांदा लस कोणाला मिळणार, कधी मिळणार, मोफत लस मिळणार, असे प्रश्न राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना विचारले आहेत. राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना भारत सरकरानं कोरोना लस बनवणाऱ्या सर्व कंपन्यांपैकी कोणत्या कंपनीची निवड केली आहे आणि का केली आहे? हा प्रश्न विचारला आहे. कोरोना लस पहिल्यांदा कोणाला उपलब्ध होणार आणि कोरोना लस मिळाल्यानंतर त्याच्या वितरणाबाबत काय धोरण ठरवण्यात आले आहे? हा प्रश्नही राहुल गांधीनी विचारला आहे. कोरोना काळात तयार केलेल्या पीएम केअरचा निधी सर्व भारतीयांना मोफत कोरोना लस देण्यासाठी वापर केला जाणार का? हा प्रश्न देखील राहुल गांधींनी उपस्थित केला आहे.
राहुल गांधी सातत्याने ट्विटरवरुन मोदी सरकारला प्रश्न विचारत आहेत. मोदी सरकारनं अवेळी, नियोजन न करता केलेल्या लॉकडाऊनमुळं देशातली लाखो लोकांना गरिबीमध्ये ढकलले. विद्यार्थ्यांमध्ये डिजीटल दरी निर्माण झाली, असा आरोप राहुल गांधींनी नरेंद्र मोदी सरकारवर केला आहे.