उस्मानाबाद (प्रतिनिधी) बदली करून देण्यासाठी १० हजाराची लाच स्वीकारणाऱ्या तसेच महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी लोकसेवक कनिष्ठ लिपिक एजाज अजीम शेख याला एसीबीने रंगेहात अटक केली आहे.
यासंदर्भात अधिक असे की, तक्रारदार यांनी बदलीसाठी अर्ज केला असून लोकसेवक कनिष्ठ लिपिक एजाज अजीम शेख (वय ४६) याने वरिष्ठ लिपिक देसाई यांना सांगून बदली करून देण्यासाठी 10,000 रुपये लाच रक्कम यापूर्वी स्वीकारल्याचे मान्य केले. तसेच सदर कामासाठी लोकसेवक कनिष्ठ लिपिक एजाज अजीम शेख यांनी दि.21 जून 2022 रोजी 10,000 रुपये लाचेची मागणी करून दि.22 जून 2022 रोजी 10,000 रुपये लाच रक्कम एजाज अजीम शेख यांनी स्वतः पांचासमक्ष स्वीकारली आहे. तसेच तु माझ्या मनात बसलीस, तु मला पहिल्याच दिवशी आवडली होतीस वगैरे म्हणून व हात धरून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक डॉ. राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, पोलीस उप अधिक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोअ/ शिधेश्र्वर तावसकर ,विष्णु बेळे , विशाल डोके, अविनाश आचार्य यांनी केली.