एरंडोल (प्रतिनिधी) जेवण बनविले नाही या कारणावरून पतीने पत्नीला लाकडी दांडक्याने मारहाण करून खून केल्याची घटना एरंडोल तालुक्यातील जवखेडा येथे घडली. याप्रकरणी एरंडोल पोलीस स्थानकात बाळू भाया भाया बारेला याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
यासंदर्भात अधिक असे की, दि. १ जून २०२२ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास बाळू भाया भाया बारेला (रा. झापडीमली ता. वरला जि. बडवाणी) याने त्याची पत्नी भुरकीबाई बाळु बारेला हिने जेवण बनविले नाही, या कारणावरून त्याच्या हातातील लाकडी दांडक्याने मारहाण करून तिचा खून केला. याप्रकरणी मयताचा भाऊ सूमसिंग फुलसिंग बारेला (वय २२ रा. मोहन पुरा भारती फुल्या वरला जिल्हा बडवानी) याने दिलेल्या फिर्यादीवरून एरंडोल पोलीस स्थानकात बाळू भाया भाया बारेला याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. तसेच पुढील तपास सपोनि गणेश अहिरे हे करीत आहेत.