मुंबई (वृत्तसंस्था) एखादी कर्तृत्ववान मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी अशी अपेक्षा बाळगणारा मोठा वर्ग मराठा समाजात आहे. तसे झाले तर माझ्यासारख्या माणसाचेही त्याला समर्थन असू शकते, असे वक्तव्य भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हटले होते. त्यावर महाविकास आघाडीची महिला मुख्यमंत्री आशिष शेलार ठरवणार आहेत का?, असा खोचक सवाल शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री अनिल परब यांनी विचारला आहे.
आशिष शेलारांनी मराठा महिला मुख्यमंत्री व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. ती भाजपची असावी की महाविकास आघाडीची असावी असं त्यांना वाटतं? महाविकास आघाडीची महिला मुख्यमंत्री आशिष शेलार ठरवणार आहेत का? आशिष शलारांनी जो दगड मारला आहे तो पोहचण्याआधीच त्याच्या ठिकऱ्या उडाल्या आहेत,’ असं म्हणत शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे.