जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रीय महामार्ग ६ च्या भूसंपादनाच्या मोबदल्याची रक्कम हडपण्यासाठी एका ५८ वर्षीय महिलेने नावाचे साम्य साधून बनावट कागदपत्र सादर करत शासनाची १६ लाख ९७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बुधवारी नायब तहसीलदार विकास लाडवंजारी यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यानुसार संशयित पुष्पा देवराम जावळे (वय ५८, रा. अंबिका सोसायटी धुळे) महिलेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील गट नं. २२०६ मध्ये मूळ मालक पुष्पा देवराम जावळे (वय ७०, रा. भुसावळ) यांच्या मालकीच्या ४८८ चौ.मी. जमिनीचे २०११ आणि २०१३ मध्ये राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणासाठी भूसंपादन झाले होते. या मोबदल्यापोटी त्यांना १६ लाख ९७ हजार रुपये मिळणे अपेक्षित होते. दि. २१ ऑगस्ट २०१८ रोजी rim पुष्पा देवराम जावळे (वय ५८, रा. धुळे) या महिलेने उपविभागीय अधिकारी कार्यालयात भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी अर्ज दाखल केला होता.
मूळ मालकाने अर्ज दाखल केल्यानंतर प्रकार उघडकीस
दि. २८ ऑगस्ट २०१९ रोजी मूळ मालक पुष्पा देवराम जावळे (वय ७०, रा. भुसावळ-पुणे) यांनी कार्यालयात मोबदला मागणीचा अर्ज दाखल केल्यानंतर तत्कालीन उपविभागीय अधिकारी दिपमाला चौरे यांनी चौकशी सुरू केली. त्यावेळी, rres’ मोबदला मिळालेली महिला (रा. धुळे) ही मूळ मालक नसून, पले तिने खोटे कागदपत्रे सादर करून फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले.
प्रशासनाला माहिती न मिळाल्याने केला गुन्हा
प्रशासनाने या महिलेचे बँकेसह अन्य पद्धतीने माहिती घेवून तिचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र ती निष्पन्न झाली नाही. अखेरीस, जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर नायब तहसीलदार विकास लाडवंजारी यांनी धुळे येथील तोतया महिलेविरोधात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद देत, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















