TheClearNews.Com
Monday, September 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिद्दीने घडवलेले रंगविश्व : ज्योती बिंद हिचा प्रेरणादायी प्रवास

पु.ना.गाडगीळ कला दालनात ३० नोव्हेंबर पर्यंत कलाकृतींचे प्रदर्शन

vijay waghmare by vijay waghmare
November 21, 2025
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी – जळगाव शहरातील मक्तेदार घनश्याम बिंद यांची कन्या, केवळ वयाच्या वीसाव्या वर्षी स्वतःचे स्वतंत्र ओळखविश्व निर्माण करणारी ज्योती घनश्याम बिंद. खोटेनगरातील साध्यासुध्या वातावरणात वाढलेली ही तरुणी आज आपल्या कलाकृतींच्या तेजाने संपूर्ण परिसर उजळवत आहे. पु.ना.गाडगीळ कला दालनात ३० नोव्हेंबरपर्यंत ज्योतीच्या कलाकृतींचे प्रदर्शन भरवण्यात आले असून जळगावकरांनी एकदा भेट देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

ज्योती शालेय जीवनात असतानाच चित्रकलेची ओढ तिच्या मनात रुंजी घालत होती. परंतु २०२० मधील लॉकडाऊनने तिच्या आयुष्याला अनपेक्षित वळण दिले. शाळा बंद, अभ्यास ठप्प, आणि जग थांबले असताना ज्योतीने मात्र रिकामेपणाला रंगांच्या उधळणीत रूपांतरित करण्याचा निर्धार केला. ब्रश हातात घेताच तिच्या भावविश्वाला नवी दिशा मिळाली. पाहता पाहता ही आवड केवळ छंद न राहता तिचे ध्येय बनली.

READ ALSO

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

कुटुंब, समाजाचा विरोध मात्र जिद्द कायम
घरच्यांचा विरोध, समाजातील मर्यादा आणि भोवतालातील नकारात्मकता हे सगळं तिच्या वाटेत काटेरी अडथळ्यांसारखे उभे राहिले. तरीही तिने कलेला आपल्या जीवनस्वप्नासारखे जपले. मू. जे. महाविद्यालयात ११ वी कला शाखेत प्रवेश घेतला, पण निरुत्साही वातावरणामुळे तिच्या वाटचालीला पुन्हा विराम मिळत असल्याचं तिला जाणवले.

पुन्हा बहरले सप्तरंगी आयुष्य
१२ वीला असताना तिच्या आयुष्यात कला शिक्षक तरुण भाटे आले. त्यांनी केवळ मार्गदर्शनच केले नाही, तर कलेतूनही उज्ज्वल करिअर उभारता येते हे सर्वांना पटवून दिले. त्यांच्या प्रेरणेने आणि योग्य माहितीमुळे ज्योतीच्या कुटुंबियांचाही दृष्टिकोन बदलला. वडिल तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि ज्योतीच्या आयुष्यातील रंग पुन्हा उजळू लागले.

आज कलाक्षेत्र हेच जीवन
१२ वी नंतर ज्योतीने ओजस्विनी कला महाविद्यालयातून कला शिक्षक डिप्लोमा पूर्ण केला आणि त्यानंतर तिच्या कलात्मक प्रवासाला खऱ्या अर्थाने भरारी मिळाली. आज ती अॅक्रिलिक, वॉटरकलर, स्केचिंग, अॅब्स्ट्रॅक्ट, पोर्ट्रेट, स्टेक्चर आर्ट, ऑइल पेंटिंग, वॉल पेंटिंग अशा सर्व प्रकारच्या चित्रकलेत समर्थपणे कलाकृती साकारते. तिच्या हातून रंगांना जीव मिळतो, आणि भावनांना आकार!

स्वप्ने सोडू नका, कलेची जोपासना करा
“कला क्षेत्रात पाऊल टाकले म्हणजे भविष्य नाही, हा गैरसमज समाजात खोलवर रुजलेला आहे. परंतु आवडीच्या क्षेत्रात काम केलं, तर यश मिळतंच. बोलणारे बोलत राहतील, पण आपले स्वप्न, आपली कला आणि आपला आत्मविश्वास कधीच सोडू नका. मुली सर्व काही करू शकतात आणि त्यांनी करायलाच हवं. ज्या लोकांनी सुरुवातीला विरोध केला, तेच आज माझ्या कलेची प्रशंसा करतात.”, असे ज्योती हिने सांगितले आहे.

कलाकृतींचे प्रदर्शन, भेट देण्याचे आवाहन
ज्योती बिंद हिचा हा प्रवास आवड, जिद्द आणि चिकाटीने स्वप्नांना रंग देणाऱ्या प्रत्येक तरुण-तरुणीसाठी एक प्रेरणादायी कथा आहे. ज्योती हिने साकारलेल्या कलाकृतींचे प्रदर्शन पु.ना.गाडगीळ कला दालनात ३० नोव्हेंबरपर्यंत भरवण्यात आले आहे. सकाळी ११ ते दुपारी ५ अशी प्रदर्शनाची वेळ असून कलाप्रेमी आणि जळगावकरांनी एकदा भेट देण्याचे आवाहन ज्योती बिंद हिने केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 सप्टेंबर 2026 !

September 14, 2026
गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
Next Post

Today's Horoscope: आजचे राशीभविष्य 22 नोव्हेंबर 2025 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावातील भोलेनाथ कंपनीत धाडसी चोरी ; रोकडसह मोबाईल लांबविला !

February 11, 2022

कौतुकास्पद निर्णय ! तृतीय पंथीयाशी बीडचा तरुण करणार विवाह !

February 23, 2022

मंगेश दादांचे नेतृत्व सर्वाना सोबत घेऊन जाणारे, त्यांच्या मागे श्रीरामाचा आशिर्वाद : एम.के.अण्णा पाटील !

April 1, 2023

श्रीराम मंदिर निधीसाठी सतपंथ संप्रदाय प्रेरणापीठाने दिला एक कोटीचा धनादेश !

February 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group