जळगाव (प्रतिनिधी) भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार महिला गंभीर जखमी झाली. हा अपघात सोमवारी दि. १४ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अजिंठा चौफुलीवर झाला. अपघातानंतर महिलेला तिच्या मुलाने खासगी रुग्णालयात दाखल केले.
शहरातील अजिंठा चौफुलीवर असलेल्या वाहनाच्या शोरुमनजीकच्या वळणाजवळ इच्छादेवीकडे जाणाऱ्या रस्त्यावर ती महिला (एमएच १९ सीटी ५२३६) क्रमांकाच्या दुचाकीने मुलासह जात होत्या. त्यावेळी तेथून जात असलेल्या भरधा व डंपरने महिलेला जोरदार धडक दिली. यात महिलेला दुखापत होण्यासह दुचाकीचेही नुकसान झाले. सुदैवाने मोठा अनर्थ टळला, मात्र या अपघातात महिला प्रचंड घाबरली होती. तिच्या मुलाने तिला रिक्षाने रुग्णालयात दाखल केले.