जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मालदाभाडी येथील एका ४२ वर्षीय महिलेचे सोन्याचे दागिने व रोकड चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी जामनेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील मालदाभाडी येथील रहिवासी लीलाबाई सुपडू चौधरी (वय ४२) यांचे सोन्याचे ५ ग्राम वजनाचे टोगल ६० हजार किमतीचे तर १५ ग्रामचे मंगळसूत्र सोबत १० हजार रुपये रोकड असा ऐवज दि.१५ रोजी घरासमोरून अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी जामनेर पोलीस स्थानकात अनोळखी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.