चोपडा (प्रतिनिधी) या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता, नमतस्यै नमतस्यै नमतस्यै नमो नम :…… शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव असून या पवित्र पर्वात देवीचा जागर करण्याच्या निमित्ताने इनरव्हील क्लबतर्फे ‘गरबा नाईट’ चे आयोजन करण्यात आले होते. गरबा नाईट साठी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा डॉ. वैशाली सौंदाणकर व सचिव पूनम गुजराथी यांनी खूप अथक परिश्रम घेतले. भव्य दिव्य गरबा नाईटला इंदिराताई पाटील व ज्योतीताई पावरा ह्या प्रमुख पाहुण्या लाभल्या होत्या. तसेच रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटे. डॉ. प्रा. ईश्वर सौंदाणकर, रोटे.आशिषभाई गुजराथी, रोटे. व्ही. एस. पाटील, रोटे. एम. डब्ल्यू. पाटील, रोटे. संजय बारी, तसेच रोटरीचे डिस्ट्रिक्ट जाॅइंट सेक्रेटरी तथा गरबा नाईटचे प्रायोजक नितीन व रश्मी अहिरराव उपस्थित होते.
याप्रसंगी विविध गटात पारितोषिके देण्यात आली. ६ ते १५ वयोगटातून गरबा प्रिन्स चि. आरव गुजराथी व गरबा प्रिन्सेस कु. धनश्री पाटील यांची निवड करण्यात आली. तर बेस्ट कॉस्च्यूमचे बक्षीस जैस्वाल बहीणींना देण्यात आले. १६ ते ५५ वयोगटातून गरबा किंग म्हणून सनम जैन तर गरबा क्वीन म्हणून सुरभी पोतदार यांनी मान मिळवला. बेस्ट कपल म्हणून खुशबू अग्रवाल व मयंक अग्रवाल यांची निवड करण्यात आली. बेस्ट कॉस्च्यूम पुरुष गटात अग्रवाल व महिला गटात निकिता अग्रवाल हे विजेते ठरले. बेस्ट डान्सर म्हणून कनन सचदेव, हितीषा पाटील, हर्षिता साळी, नेहा जैन, भावना चौधरी यांनी बक्षिसे पटकावली. इनरव्हील सभासदांमधून बेस्ट डान्सर म्हणून सौ आशा वाघजाळे, सौ. सरोज पाटील, सौ. सोनल जैन यांना बक्षिसे देण्यात आली. तर वयोगट ५०+ मधे सौ. वारडे मॅडम यांना बक्षिस देण्यात आले. सर्व बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. परीक्षणाचे काम रोटे. लिना पाटील व सौ. ज्योती टाटीया यांनी पाहीले. नेहमीपेक्षा गरबा नाईटला उत्फुर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यात भगिनी मंडळाच्या सर्व विभागातील मुख्याध्यापक व शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी तसेच इनरव्हील क्लबच्या सभासदांचे सहकार्य लाभले .