गलंगी, ता. चोपडा (प्रतिनिधी) गणपूर येथील ग्रामपंचायत चौकातील नरेंद्र माऊली ज्वेलर्सचे शटर रात्री वाकवून दुकानातील सुमारे ६० हजाराच्या चांदी, सोन्याच्या वस्तू चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना सकाळी उघडकीस आली.
गणपूरच्या ग्रामपंचायत चौकातील गाव दरवाजाजवळ गौरव जितेंद्र सोनार यांच्या मालकीचे नरेंद्र माऊली ज्वेलर्स हे ज्वेलरी शॉप आहे. ते तेथे सोने, चांदीचा व्यवसाय करतात. आज सकाळी दुकानाचे शटर वाकल्याचे नागरिकांना दिसून आले.
दरम्यान, चोरट्यांनी रात्री दुकान फोडून सोने, चांदीच्या वस्तू व रोकड असा जवळपास ६० हजारांचा ऐवज लंपास केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर एका मोबाईल शॉपीचे ही रात्री चोरट्यांनी कुलूप तोडल्याचे सकाळी लक्षात आले. विशेष म्हणजे नरेंद्र माऊली ज्वेलर्सचे संचालक गौरव सोनार रात्री ३ वाजता भजनाचा कार्यक्रम आटोपून त्यांच्या मूळ गावी घोडगाव येथे गेले होते. तर सव्वातीन वाजता चोरट्यांनी दुकान उघडल्याचे सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून लक्षात आले. दरम्यान, सकाळी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. या घटनेचा तपास पोलस करत आहेत.