धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील गारखेडे ग्रुप ग्राम पंचायतच्या एका महिला सदस्याला जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र घोषित केले आहे. साधनाबाई किशोर पाटील, असे अपात्र झालेल्या ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे. तर याबाबत संगीताबाई भास्कर पाटील (सरपंच) यांनी तक्रार केली होती.
याबाबत अधिक असे की, साधनाबाई किशोर पाटील यांनी त्यांचा प्रभारी सरपंच पदाचा कार्यकाळ १३ डिसेंबर २०२२ रोजी संपल्यावर सरपंच पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर देखील साधनाबाई किशोर पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या बँक खात्यातून काढलेली दिसून येत आहे. सदरची पूर्ण रक्कम बँकेमधून त्यांचे पती किशोर प्रताप पाटील यांनी घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे साधनाबाई पाटील यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम १४ (ग) नुसार पदाचा गैरवापर केल्याने त्यांना जिल्हाधिकारी जळगाव यांनी १५ मार्च २०२४ रोजी पारित केलेल्या आदेशाप्रमाणे सदस्य /उपसरपंच पदावरून अपात्र घोषित करण्यात आले आहे.