आडगाव ता. चाळीसगाव (प्रतिनिधी) देशाच्या स्वांतत्र्याला ७५ वर्षा निमित्त आझादी का अमृत महोत्सवानिमित्त केंद्राच्या ग्रामविकास विभागामार्फत तालुक्यात उमेद अभियानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेसोबत महिलांशी संवाद कार्यक्रम पार पडला. महिलांनी आर्थिक उन्नतीसाठी उमेद अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन उमंग समाजशिल्पी महीला परिवाराच्या संस्थापिका अध्यक्षा सौ. संपदाताई उन्मेशदादा पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान “उमेद”च्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे काम सुरू आहे. ग्रामीण भागातील महिलांनी आपल्या घराच्या उंबरठ्याच्या बाहेर पडून जगात उपलब्ध असलेल्या आर्थिक प्रगतीच्या पर्यायांना निवडून आपल्यासह आपल्या परिवाराचे आर्थिक उन्नती साधावी यासाठी जीवन्नोन्नती अभियान असून भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ वर्षा निमित्त मार्च २०२१ ते ऑगस्ट २०२१ या ७५ आठवड्यांच्या कालावधीत आजादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात येणार असून माझ्या महिला भगिनींनी स्वयंसहायता, समूह ग्रामसंघ, प्रभाग संघ, शेतकरी उत्पादक संघ, उत्पादक गट तसेच पंचायतराज संस्थातील सदस्य यांनी या अभियानाच्या माध्यमातून आपल्या जीवनात आर्थिक क्रांती साधावी, असे आवाहन उमंग समाजशिल्पी महीला परिवाराच्या संस्थापिका अध्यक्षा सौ. संपदाताई उन्मेशदादा पाटील यांनी व्यक्त केली आहे.
चाळीसगाव पंचायत समितीच्या माध्यमातून केंद्राच्या ग्रामविकास विभाग आयोजित तालुक्यातील विविध ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांशी सुसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून आयोजित आडगाव जिल्हा परिषद शाळेत झालेल्या कार्यक्रमात सौ.संपदाताई पाटील बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर आडगावचे लोकनियुक्त सरपंच रावसाहेब पाटील, शाळेचे मुख्याध्यापक पी.बी.चव्हाण, ग्रामसेवक विजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य जगदीश पाटील, अभियान समन्वयक प्रताप शिवरकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. तर पिंप्री प्रदे येथे झालेल्या कार्यक्रमाला सरपंच सचिन पाटील, सुभाष काका पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते प्रतापमामा पाटील, समन्वयक विकी पाटील, उपसरपंच मंगलबाई गुलाब पाटील, ग्रा.पं.सदस्य सुनंदाताई पाटील, उज्वलाताई पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
सौ. संपदाताई पाटील पुढे म्हणाल्या की, महिला देखील आपल्या परिसरातील भगिनींनी डिजिटल युगात समर्थपणे उत्पन्नाचे साधन शोधत आहे. आज ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणावर भगिनींनी अनेक व्यवसायमध्ये बचत गटाच्या माध्यमातून नावलौकिक कमावला असून चूल आणि मूल याव्यतिरिक्त देखील आपले जग असून या जागेला जगाला कवेत घेण्यासाठी कंबर कसली आहे. आपल्या मनातला संकल्प पूर्ण करण्यासाठी माझ्या माता- भगिनींनी परिवाराची जबाबदारी सांभाळताना देखील आर्थिक साक्षरता जोपासत आर्थिक उन्नती साधली याची अनेक उदाहरणे आता समाजात दिसू लागली आहे. सर्वसामान्य व्यक्ती गरिबीतून बाहेर पडू शकतो. मात्र त्यास आवश्यक विश्वास उमेदअभियानाची मदत घ्यावी. यातून सर्वसामान्य महिला भगिनी गरिबीतून बाहेर पडू शकते हा विश्वास देण्याचं काम उमेद अभियानाने केले आहे.
या विश्वातून दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी गरिबांना एकत्र आणून त्यांच्या सक्षम संस्था उभा करणे, गरीब वंचित महिलांचा समावेश असलेल्या स्वयंसहायता गटाच्या माध्यमातून या बचत गटांची क्षमता, वृत्ती कौशल्यवृद्धी या माध्यमातून त्यांच्या जीवनात आर्थिक साक्षरता घडवून आणण्याचं काम उमेद अभियानातून झाल्याने मोठ्या प्रमाणावर महिला स्वावलंबी होत असल्याचे आनंद असल्याची भावना उमंग समाज शिल्पी महीला परिवाराच्या संस्थापिका अध्यक्ष संपदाताई पाटील यांनी व्यक्त केली आहे. सुरुवातीला तालुका समन्वयक प्रताप शिवरकर यांनी प्रास्ताविक केले. आडगावचे सरपंच रावसाहेब पाटील यांनी संपदाताई पाटील यांचा सत्कार केला. आडगाव, पिंप्री, देवळी, डोणदिगर, टाकळी प्रदे ,तळोदे प्रदे, देशमुखवाडी ,तामसवाडी, उपखेड,अलवाडी, चिंचखेडे पिंपळवाड म्हाळसा, पातोंडा, रांजणगाव यासह विविध ठिकाणी या अभियानाअंतर्गत महिलांनी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा थेट संवाद कार्यक्रमाचा लाभ घेतला.