धरणगाव (प्रतिनिधी) प्रशासनाने सर्वसामान्य व शेतकरी हित केंद्र बिंदू मानून गतिमान पद्धतीने जनतेची कामे करावी . सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून पाणी पुरवठा योजनाच्या व इतर विकास कामांत हयगय खपून घेणार नसल्याचा अधिकारी व कर्मचार्यांना पालकमंत्री यांनी इशारा दिला. अधिकाऱ्यांनी पाणी पुरवठा विभागाची स्वतंत्र बैठक घेऊन काम निहाय माहिती घेऊन पा.पु. योजना सुरु न करणाऱ्या ठेकादारांना नोटीसा देऊन काळ्या यादीत टाकण्याच्या सुचना करून त्यांनी चांगले काम करणांचे कौतुक करत, दिरंगाई करणाऱ्यांना खडसावले. ग्रामीण विकासातील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि तहसील असून यात जनहिताच्या योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कर्मचार्यांनी अपडेट रहावे. तसेच अचूक नियोजनातून तालुक्याच्या विकासाला गती द्यावी . सरपंचांनी व लोक प्रतिनिधींनी दिलेल्या सूचना दिशादर्शक मानून तालुक्याच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. ते आज येथील जी. एस. लॉन येथे आयोजित पंचायत समितीच्या आढावा बैठकीत बोलत होते.
भिल्ल समाजाला जातीचे प्रमाणपत्र व रेशनकार्ड साठी शिबिरांचे आयोजन करण्याचे निर्देश !
तालुक्यातील भिल्ल समाजाच्या व आदिवासी नागरिकाना जातीचे प्रमाणपत्र व रेशनकार्ड बाबत ठीक ठिकाणी शिबिरांचे आयोजन करून गरजू व पात्र लाभार्थ्यांना दिलासा देण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तहसीलदार यांना निर्देश दिले. पाणी पुरवठा विभागाची स्वतंत्र बैठक घेऊन काम निहाय माहिती घेऊन पा.पु. योजना सुरु न करणाऱ्या ठेकादारांना नोटीसा देऊन काळ्या यादीत टाकण्याच्या सुचना यावेळी देण्यात आल्या. तसेच १४ व्या आणि १५ व्या वित्त आयोगातून प्रत्येक गावाला मिळालेला निधी आणि याचा विनियोग याबाबतची माहिती सात दिवसात BDO यांनी अपडेट करण्याचे निर्देश दिले. प्रत्येक विकास कामांचे बोर्ड हे ठळकपणे दिसतील अश्या ठिकाणी लावण्यात यावे, शिक्षण विभागातर्फे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी १६ कलमी कार्यक्रम राबवून पट संख्या वाढीसाठी प्रयत्न करा, अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्यालयी राहावे., सद्या पावसालायचे दिवस असल्याने साथीचे आजार होवू नये यासाठी विशेष काळजी घ्यावी., माई घरकुल, शबरी घरकुल व पंतप्रधान आवास घरकुल योजनेचे १०० % उद्दिष्ट पूर्ण करा, प्रत्येक गावात स्वच्छता मोहिम आणि जनजागृती राबविण्याच्या सूचना करून खतांची कृतीम टंचाई करणाऱ्यांवर व बोगस खत विक्रेत्यानावर कठोर कारवाई करा व शासन स्तरावर विकास कामांचे प्रस्ताव असल्यास तात्काळ सादर करण्याच्या निर्देश हि दिलेत.
या विभागांची घेतली झाडाझडती !
याबाबत आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली धरणगाव येथील जी एस लॉन येथे आढावा बैठक घेण्यात आली. यात पाणी पुरवठा , ग्रामपंचायत, आरोग्य, सार्वजनीक व जिल्हा परिषद बांधकाम , स्वच्छता, शिंचन , शिक्षण ,पशुसंवर्धन , एम.एस.ई.बी .आरोग्य, तहसील , कृषी, मनरेगा, आदी विविध विभागांमधील सुरु असलेल्या व मंजूर कामांची सद्यस्थितीची माहिती त्यांनी जाणून घेत गरम पंचायत निहाय कामांची झाडाझडती घेतली. सार्वजनिक बांधकाम मार्फत यावर्षी मंजूर असलेल्या सुमारे १५० कोटी निधीतील रस्ते व पूल तसेच मंजूर असलेले ३३ तलाठी कार्यालय व ६ मंडळ अधिकारी कार्यलय बांधकामे तात्काळ सुरु करा, धरणगाव नगरपालिकेत यावर्षी वैशित्येपूर्ण योजनेतर्गत , नागरोत्थान , नागरी दलितेतर योजनेतर्गत ४२ कामासाठी १४ कोटी निधी मजूर असून कामे तात्काळ मार्गी लावा, लावण्याचे निर्देश देण्यात आले.
प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे पाळकमंत्र्यांचे निर्देश !
ना. गुलाबराव पाटील यांनी तालुक्याच्या विकासासाठी विविध कामांना गती देण्याचे सूचित केले. यात प्रामुख्याने पाळधी येथील रेल्वेवर उड्डाण पूलाच प्रस्ताव , नगरोत्थान योजतेतून धरणगावातील बस स्थानक परिसराचे सुशोभीकरण, तालुक्यातील महत्वाच्या पर्यटन विकाचे प्रस्ताव, तालुक्यातील सार्वजनीक आणि वैयक्तिक शौचालये प्रस्ताव, सिंचन विभागातातर्फे साठवण बंधारे आणि सिमेंट नाला बांध , ग्राम्पांच्यात कार्यालय याबाबतचे प्रस्ताव तात्काळ तयार करण्यात यावेत तालुक्याच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. तर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहण्याच्या सूचना देखील दिल्या.
यांची होती उपस्थिती !
सुरुवातीला तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी व गट विकास अधिकारी यांनी आप – आपल्या विभागाचा सविस्तर अहवाल सादर केला. बैठकीप्रसंगी जिल्हा प्रमुख निलेश पाटील, माजी सभापतीमुकुंदराव नन्नवरे, प्रेमराज पाटील, अनिल पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, गोपाल चौधरी, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन पवार, उप जिल्हाप्रमुख पी. एम. पाटील सर , रविंद्र चव्हाण सर, गटनेते पप्पू भावे, शहर प्रमुख विलास महाजन, तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, गट विकास अधिकारी सुशांत पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी संजय चव्हाण, नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते, तालुका कृषी अधिकारी गिरीश देशमाने, पी. आय. व्ही.के. डमाले, सा.बा.चे सहा. कार्यकारी अभियंता एस.डी. पाटील, श्री. वंजारी गटशिक्षणाधिकारी , सर्व विस्तार अधिकारी , ग्रामविकास अधिकारी , ग्रामसेवक,तलाठी, कृषी सहायक ,यांच्यासह सर्व सरपंच , पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.