मुंबई प्रतिनिधी । लॉकडाऊनमुळे बऱ्याच कंपन्यांत वर्क फ्रॉम होम चालू आहे. परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतरही काही प्रमाणात कंपन्या वर्क फॉर्म होऊन चालू ठेवण्याची शक्यता असल्याचे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स यांनी म्हटले आहे.
एका नियकालिकाशी वेबिनारवरून संवाद साधताना ते म्हणाले की, बऱ्याच कंपन्या खर्चात कपात करण्यासाठी काही काम कर्मचाऱ्यांकडून घरातूनच करून घेण्याची शक्यता आहे. मी स्वतः या वर्षी अजिबात प्रवास केला नाही. मात्र, वर्क फॉर्म होमसाठीचे सॉफ्टवेअर अजूनही पुरेसे विकसित झालेले दिसत नाही, असे गेट्स म्हणाले. घरातून काम करताना महिलांना पुरुषांपेक्षा जास्त त्रास होत असल्याची शक्यता आहे. कारण महिलांना घरातील इतर कामांकडे लक्ष द्यावे लागते.