पारोळा (प्रतिनिधी) तालुक्यातील दळवेल येथे बंद घर फोडत अज्ञात चोरट्यांनी भरदिवस सोने व रोख रुपये असा एकूण ६ लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली.
दळवेल येथील दीपक पांडुरंग पाटील शेतकरी कुटुंब दिनांक २९ रोजी नेहमीप्रमाणे घरातली कामे आवरून शेतात निघून गेले होते. दुपारी बाराच्या सुमारास कोणीतरी अज्ञात चोरट्याने घरातील १४ तोळे सोने त्यात (मंगल पोत, चार सोन्याच्या अंगठ्या) आणि सव्वा दोन लाख रुपये एकूण रोख, असा एकूण सहा लाख रुपयाचा ऐवज लंपास केला आहे.
दरम्यान, दीपक पाटील यांनी काही महिन्यापूर्वी कापूस विक्रीतून आलेले पैसे हे घरातच ठेवले होते. त्यावर चोरट्यांनी डल्ला मारल्यामुळे ते हवालदिल झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे दाखल झाले होते. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वान पथकाचीही मदत घेण्यात आली.