नांदेड (वृत्तसंस्था) भोकर तालुक्यातील रावणगाव येथील एका शेतकऱ्याचा १९ एप्रिल रोजी उष्माघाताने मृत्यू झाला आहे. भगवान विठ्ठलराव कदम (४२), असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.
भोकर तालुक्यातील रावणगाव येथील शेतकरी भगवान कदम यांचा १९ एप्रिल रोजी उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडली. भोकर तालुक्यातील रावणगाव येथील शेतकरी भगवान कदम हे १८ एप्रिल रोजी घराच्या बांधकामासाठी लाकडे तोडण्यासाठी शेताकडे गेले होते. दिवसभर उन्हामध्ये त्यांनी काम केले. उन्हाची तीव्रता अधिक असल्याने त्यांना रात्री त्रासही जाणवू लागला होता. परंतू तरी देखील ते १९ एप्रिल रोजी सकाळी शेतात गेले. शेतातून परत येत असतांना ११ वाजेच्या ते झाडाखाली एका बसले. याठिकाणी तहान लागल्यामुळे त्यांनी पाणी प्यायले. परंतू पाणी पिताच भगवान कदम यांच्स जागेवरच मृत्यू झाला. उष्माघाताने हा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.