लंडन (वृत्तसंस्था) जगात आजही दुसरे महायुद्ध भयावह त्याच्या आठवणींमुळे स्मरणात आहे. यावेळी दोन्ही प्रतिस्पर्थ्यांनी बॉम्बने एकमेकांच्या ताब्यात घेतलेल्या जागांवर हल्ले केले होते. या सगळ्या नकोशा आठवणींदरम्यानच इंग्लंडमधील एक्सेटर सिटीमधून एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. तब्बल आठ दशकांनंतर दुसऱ्या महायुद्धातील एका बॉम्बचा स्फोट झाला आहे. हा बॉम्ब असल्याचे निष्पन्न होताच, २६०० लोकांचे शहरातून स्थलांतर करण्यात आले.
एक्स्टर शहरात बॉम्ब असल्याची माहिती मिळाली. एक्झीटर युनिव्हर्सिटीच्या कंपाऊंडमध्ये शुक्रवारी बॉम्ब दिसला. यानंतर बॉम्ब निकामी करणारे पथक आणि पोलिसांनी संपूर्ण परिसर रिकामा करण्याचे आदेश दिले. विद्यापीठाच्या १४०० विद्यार्थ्यांसह ग्लेनथोर्न रोड परिसरात राहणाऱ्या सुमारे २६०० घरांतील रहिवाशांना परिसर रिकामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शुक्रवार आणि शनिवारी सर्वांना या परिसरापासून दूर सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगण्यात आले. रविवारी संध्याकाळी ६.१० वाजता हा धोकादायक बॉम्ब रिमोट कंट्रोलद्वारे निकामी करण्यात आला.
बॉम्ब स्फोट इतका शक्तिशाली होता की, त्याचा आवाज सुमारे १०: किलोमीटरपर्यंत ऐकू येत होता. या भीषण स्फोटांमुळे जवळील अनेक घरांच्या भिंती आणि खिडक्या तुटल्या. आता ही घरे धोक्यात असून कधीही पडण्याच्या स्थितीत आहेत. व्हिडिओमध्ये स्फोटाचा ढिगारा उडताना दिसत आहे. बॉम्ब निकामी झाल्यानंतरही लोकांना त्यांच्या घरी परत जाण्याची परवानगी नव्हती.
















