TheClearNews.Com
Monday, March 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जैन इरिगेशनतर्फे जागतिक जलदिवस साजरा ; ह.भ.प. हृषीकेश महाराज यांचे जलकीर्तन

चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण

The Clear News Desk by The Clear News Desk
March 22, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) ‘आम्ही पाण्याचा वारेमाप वापर केला व करीत आहोत पुढील पिढीसाठी पाणी बचतीची सुबुद्धी आपल्या सर्वांना मिळो…’ असे विचार डॉ. सुदर्शन आयंगार यांनी व्यक्त केले. येथील भाऊंच्या उद्यानातील ऍम्फी थिएटरमध्ये जागतिक जल दिनाच्या औचित्याने जैन इरिगेशन तर्फे ह.भ.प हृषीकेश महाराज यांचे जलकीर्तन आणि जागतिक जल दिनानिमित्ताने घेतलेल्या चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा झाला. या कार्यक्रमास गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ सुदर्शन आयंगार, डॉ गीता धरमपाल, हभप हृषीकेश महाराज व्यासपीठावर होते.

पाण्याचे महत्व सांगणारे श्रवणीय कीर्तन

READ ALSO

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

ह.भ.प. हृषीकेश महाराज यांनी आपल्या कीर्तन सेवेत ‘बळ बुद्धी वेचुनिया शक्ती, उदक चालवावे युक्ती’ असा तुकोबांचा अभंग कीर्तन निरूपणासाठी घेतला होता. संत तुकाराम महाराजांचा संदेश, त्याचा अर्थ त्यांनी उपस्थितांना समजावून सांगितला. साडेचारशे वर्षांपूर्वी संत तुकाराम महाराजांनी पाणी वाचविण्याचा उपदेश केला. आज्ञा, अनुज्ञा, अर्थानुपत्ती याबाबत सांगितलं.

शहरातील विविध शैक्षणिक संस्थांमधील 395 विद्यार्थी जागतिक जलदिवसाच्या निमित्त चित्रकला स्पर्धेत सहभागी झाले होते. पाणी या विषयावर विद्यार्थ्यांनी अत्यंत कल्पक चित्रांच्या माध्यमातून पाणी बचतीचा संदेश दिला. त्यातून 12 विजेते विद्यार्थी निवडले गेले. त्यात पहिल्या गटातून  यादे देवचंद पाटील माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी  तेजस प्रमोद जोगी तर दुसऱ्या गटातून विद्या इंग्लिश मीडिया स्कूलची निकिता देवराज पाटील ही पहिली ठरली. दोन विशेषगटातुन विवेकानंद प्रतिष्ठान संचलित श्रवण विकास मंदिर, सावखेडाचे तेजस सोनवणे व भूषण इंगळे यांची निवड झाली.

पहिल्या गटातील द्वितीय- विशाल जैन, (मु. जे. महाविद्यालय), वैष्णवी इखे (स्वामी समर्थ विद्यालय, कुसुंबा), ललित सदाफळे, (न्यु इंग्लिश स्कूल, जळगाव), तनुश्री प्रकाश भारोटे, (नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय), तर दुसऱ्या गटातील तनिष्का संदानसिवे (ओरियन इंग्लिश मिडीयम स्कूल), आदयाशा परिदा (विद्या इंग्लिश मिडीयम स्कूल), नव्या दोशी (किड्स गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल), तोशल आमले (ब गो शानभाग विद्यालय) या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. चित्रकला स्पर्धेचे परीक्षक सुशील चौधरी, प्रदीप पवार यांचा आणि ज्या शाळेतील विद्यार्थी सहभाग अधिक होता त्या शाळांच्या प्रतिनिधींचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला.

निवडक चित्रांचे प्रदर्शन

आयोजित चित्रकला स्पर्धेला उत्तम प्रतिसाद लाभला. त्यातील काही निवडक चित्रकृतींचे प्रदर्शन भाऊंच्या उद्यानात भरविण्यात आले, त्याचे उद्घाटन डॉ. सुदर्शन आयंगार, डॉ. गीता धरमपाल, ह.भ.प. हृषीकेश महाराज यांच्याहस्ते करण्यात आले. या प्रदर्शनासाठी 120 विद्यार्थ्यांच्या चित्रांची निवड झालेली आहे. हे प्रदर्शन उद्यानाच्या वेळेत प्रेक्षकांना बघता येणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पारितोषिक सोहळ्याचे संचालन गिरीष कुळकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर शेंडे यांनी तर आभारप्रदर्शन आनंद पाटील यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
जळगाव

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

March 28, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
Next Post

Horoscope : राशिभविष्य, बुधवार २३ मार्च २०२२ ; जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘आम्हा तिन्ही पक्षांना रोज एकमेकांची आठवण येते’ ; राऊतांच्या विधानाने सभागृहात एकच हशा !

December 11, 2021

गणपूर प्राथमिक शाळेत बालआनंद मेळाव्याचे आयोजन !

December 8, 2023

ब्रेकिंग न्यूज : बीएचआर घोटाळ्यात आणखी तिघांना अटक !

June 17, 2021

शतकोत्तर पी.आर.हायस्कूलमध्ये संत रविदास जयंतीनिमित्त अभिवादन

February 16, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group