जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज २८५ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहे. तर दुसरीकडे १९ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर – ८१, जळगाव ग्रामीण-१७, भुसावळ-१०४, अमळनेर-०५, चोपडा-२२, पाचोरा-०३, भडगाव-००, धरणगाव-०२, यावल-०१, एरंडोल-००, जामनेर-०३, रावेर-००, पारोळा-०५, चाळीसगाव-२९, मुक्ताईनगर-१२, बोदवड-००, इतर जिल्ह्यातील-०१ असे एकुण २८५ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १ लाख ४३ हजार ८९२ पर्यंत पोहचली असून १ लाख ४० हजार २८० रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत २५८० रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर १०३२ रुग्ण सध्या उपचार घेताय.