जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ८७ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहे. आज एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
जळगाव शहर – १६, जळगाव ग्रामीण-०१, भुसावळ-४०, अमळनेर-०५, चोपडा-०६, पाचोरा-००, भडगाव-०१, धरणगाव-०१, यावल-००, एरंडोल-००, जामनेर-०१, रावेर-००, पारोळा-०२, चाळीसगाव-०९, मुक्ताईनगर-०४, बोदवड-००, इतर जिल्ह्यातील-०१ असे एकुण ८७ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १ लाख ४३ हजार १२७ पर्यंत पोहचली असून १ लाख ४० हजार २३८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. त्यानुसार आतापर्यंत २५७९ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर ३१० रुग्ण सध्या उपचार घेताय.