धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पाळधी खुर्द येथे डेंग्यूचा रुग्ण सापडल्याचे वृत्त समोर आले आहे.
पाळधी येथील रहिवासी फरीद अमिद देशपांडे यांची मुलगी सिद्धिका फरीद देशपांडे (वय ९ वर्ष) हिला डेंग्यू झाल्याचे वृत्त आहे. सिद्धीका सध्या जळगावात खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहे. तिची परिस्थिती गंभीर असून तिला आयसीयूमध्ये ऑक्सीजनवर ठेवण्यात आले आहे. दरम्यान, डेंग्यूचा रुग्ण सापडल्याने पाळधी गावात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.