नवी दिल्ली (वृत्तसंस्था) रशियात पोल्ट्री फार्ममध्ये काम करणाऱ्या तीन कामगारांना बर्ड फ्लूचा संसर्ग झाला आहे. माणसाला बर्ड फ्लूची लागण होण्याची ही जगातील पहिलीच घटना असून, या घटनेची माहिती जागतिक आरोग्य संघटनेलाही देण्यात आली आहे.
दक्षिण रशियात एका पोल्ट्री फार्ममध्ये काम करणाऱ्या सात कामगारांना बर्ड फ्लूची लागण झाली आहे. या पोल्ट्री फार्ममध्ये डिसेंबरमध्ये बर्ड फ्लूचा उद्रेक झाला होता. मात्र, अशी परिस्थिती पुन्हा निर्माण झाली नाही. वेगवेगळ्या देशात स्थलांतर करणाऱ्या पक्षांमुळे बर्ड फ्लूचा प्रसार वेगानं झाला आहे. त्यामुळे प्रत्येक देशाने पोल्ट्रीचे प्रकल्प बंदिस्त स्वरूपात किंवा स्थलांतर करणाऱ्या पक्षांचा संपर्क होणार नाही, अशा पद्धतीने करण्याची गरज आहे.
गेल्या काही महिन्यांपासून रशियासह युरोप, चीन, उत्तर आफ्रिका आणि मध्य पूर्वेतील देशांमध्ये बर्ड फ्लू’चा (एच५एन८) उद्रेक झाला आहे. मात्र, केवळ पोल्ट्री कोंबड्यांना या विषाणूचा संसर्ग होत असल्याचं दिसून येत होतं. मात्र, आता माणसालाही याचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. माणसाला बर्ड फ्लूचा संसर्ग होण्याची शक्यता नाहीत. मात्र, बर्ड फ्लूने संक्रमित जिवंत वा मृत कोंबडीच्या थेट संपर्कात आल्यानं संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे व्यवस्थितपणे शिजवून खालेलं अन्न सुरक्षित आहे. माणसाला बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेलाही देण्यात आली आहे.