यावल (प्रतिनिधी) मागील एक वर्षापासून सुरु असलेल्या अत्याचारातून एक १२ वर्षीय बालिका गर्भवती राहिल्याचा संतापजनक प्रकार तालुक्यातील एका गावात उघडकीस आला आहे. या प्रकरणी यावल पोलिसात (yaval police) अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (16-year-old boy rapes on minor girl)
तालुक्यातील एका गावात पिडीता आपल्या वडिलांसह राहते. १६ वर्षीय संशयित आरोपी हा सुमारे १ वर्षापासून तर डिसेंबर २०२२ पावतो पिडीतेच्या तसेच त्याच्या घरी व शेतात अल्पवयीन बालिकेवर वेळोवेळी बलात्कार केला. या अत्याचारातून पिडीता गरोदर राहील्याचे माहीत असून देखील तिच्यावर वारंवार बलात्कार करीत राहीला. या प्रकरणी पिडीत बालिकेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनिता कोळपकर ह्या करीत आहेत.