यावल (प्रतिनिधी) जन्मदात्या वडिलांनीच स्वत:च्या पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. बाप-लेकीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी भयंकर घटनेमुळे यावल तालुका हादरून गेला आहे. या प्रकरणी संबंधीत व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल तालुक्यातील एका गावात एक व्यक्तीने आपल्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य करत असल्याचे त्याच्या पत्नीला आढळून आले. यामुळे ती महिला सावध राहू लागली. मात्र एके दिवशी या माथेफिरू व्यक्तीने आपल्या मुलीस झोपेच्या गोळ्या देऊन तिच्यावर अत्याचार केला. यामुळे त्या महिलेने पोलीस स्थानकात धाव घेऊन आपल्या पतीच्या विरोधात पोलीस स्थानकात तक्रार दिली. या तक्रारीवरून विविध कलमा अन्वये यावल पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास यावल येथील पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सहकारी करत आहेत.