जळगाव (प्रतिनिधी) येथील रिद्धी जान्हवी फाउंडेशन व आदिशक्ति महिला मंडळतर्फे आज सकाळी ठीक ७ ते ८ या वेळेत पांझरपोळ नेरी नाका येथे योगादिनानिमित्त योग प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी शहरातील सर्व योगा प्रेमींनी कार्यक्रमाला हजेरी लावली.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रशिक्षक डॉ. विकास निकम उपस्थित होते. रिद्धी जानवी फाऊंडेशन अध्यक्षा चित्रा मालपाणी, आदिशक्ती महिला मंडल अध्यक्षा दीपा तापडिया यांनी या कार्यक्रमाला उपस्थित सर्व योगा प्रेमी तसेच डॉ.विकास निकम यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. रिद्धी जान्हवी फाउंडेशन च्या वतीने चित्रलेखा मालपाणी यांच्या तर्फे आभार प्रदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाला किरण शर्मा कीर्ती काबरा नील कमल टाक ई.सदस्य उपस्थित होते. शिबिराचा अजून एक दिवस बाकी असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
















