चोपडा (प्रतिनिधी) अमळनेर येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाखेतर्फे पितृ दिनानिमित्त आयोजित खान्देशस्तरीय काव्यस्पर्धेत येथील मसाप कार्यकारणी सदस्या तथा प्रताप विद्या मंदिरातील शिक्षिका कवयित्री योगिता नितीन पाटील यांना प्रथम क्रमांक जाहीर झाला आहे.
आज पितृदिनाच्या दिवशी या काव्य स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. ‘बाप’ या विषयावर आयोजित या स्पर्धेत खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील ४९ कवींनी सहभाग घेतला होता. यातील विजेत्या ६ स्पर्धकांना बक्षिसे देण्यात येणार आहेत तर प्रथम १० कवींना मसाप शाखेच्या वतीने लवकरच आयोजित कवी संमेलनात कविता सादर करण्याची संधी देण्यात येणार आहे. काव्य स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे –
प्रथम : योगिता पाटील (चोपडा), द्वितीय : प्रकाश पाटील (पिंगळवाडे), तृतीय : दत्तात्रय कुळकर्णी (जामनेर), उत्तेजनार्थ : तीन बक्षिसे – जयराम मोरे (सोनगीर), गो.शि.म्हस्कर (नगरदेवळा), रमेश धनगर (गिरड) सर्व विजेत्या स्पर्धकांचे मसाप शाखेचे कार्याध्यक्ष रमेश पवार,प्रमुख कार्यवाह दिनेश नाईक, कोषाध्यक्ष संदीप घोरपडे, स्पर्धा प्रमुख प्रा.डॉ.रमेश माने व सर्व कार्यकारी मंडळाने अभिनंदन केले आहे. तसेच मसाप चोपडा शाखेचे संस्थापक अध्यक्ष कवी अशोक सोनवणे, उपाध्यक्ष राजेंद्र महाजन, कार्याध्यक्ष विलास पाटील, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष घनशाम अग्रवाल, कार्यवाह श्रीकांत नेवे यांनी सौ. योगिता पाटील यांचे अभिनंदन केले.