जळगाव (प्रतिनिधी) शहरातील एका तरुणीला घरी बोलून अश्लिल संभाषण करून विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रौनककुमार कुकरेजा (सिंधी कॉलनी, जळगाव) असे गुन्हा दाखल केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
या संदर्भात पिडीत तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. ३० जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास रौनककुमारने पिडीत तरुणीला घरी बोलावले. त्यानंतर पिडीत तरुणीस घरातील हॉलमधील पलंगावर बसण्यास सांगितले. त्यानंतर हात पकडून पीडीतेला जवळ ओढत अश्लिल संभाषण केले. याप्रकरणी संशयित आरोपी रौनककुमार कुकरेजा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ प्रदिप पाटील हे करीत आहेत.
















