कासोदा (प्रतिनिधी) खाजगी सावकाराकडून व्याजाने घेतलेल्या पैशांच्या तगाद्याला कंटाळून उत्राणच्या एका २१ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली होती. जयवंत नरेंद्र चौधरी (वय २१) असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मयत तरुणाच्या आईच्या फिर्यादीवरून एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
या संदर्भात मंगलाबाई नरेंद्र चौधरी (वय ४०, नौकरी अंगणवाडी सेविका) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचा मुलगा नामे जयवंत नरेन्द्र चौधरी (वय २१, रा.उत्राण ता.एरंडोल) याने टी.व्ही चा हप्ता भरण्यासाठी अजय उर्फ पप्पू ईश्वर वाघ (धोबी) याच्याकडून ७ हजार रूपये व्याजाने घेतले होते. व्याजपोटी जयवंतने ३ हजार रुपये उसणवार त्याच्या मित्रांकडून घेवून दिले होते. तरी देखील अजय याने पैशांसाठी सतत जयवं कडे उत्राण गावामध्ये वारंवार पैश्याची मागणी करायचा. जयवंतकडे तगादा लावून व दबाव निर्माण करून त्याच्या मनात भिती घालून त्याची मो.सा. त्याचे ईच्छे विरुध्द गाहाण ठेवण्यास सांगून त्रास देत होता. याच त्रासाला कंटाळून जयवंत याने रेल्वे स्टेशन पाचो-याजवळ धावत्या रेल्वेगाडी खाली आत्महत्या केली होती. याप्रकरणी अजय उर्फ पप्पू ईश्वर वाघ (धोबी) याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तापस सपोनि निता कायटे ह्या करीत आहेत.