जळगाव (प्रतिनिधी) कृषीनगर पचोरा येथील अवघ्या एकवीस वर्षीय तरुणीचा विवाह मनोरुग्णा सोबत लावून देत सासरच्यांनी ७ लाख ७० हजारांसाठी पिडीतेचा छळ चालवला प्रकार समोर आला आहे. स्त्रीधन काढून घेत हकलून लावल्यानंतर पिडीतेच्या तक्रारीवरुन साक्री पेालिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
यासंदर्भात अधिक असे की, सिमा सागर शिवणेकर (वय-२१), या तरुणीने दिलेल्या तक्रारीत नमुद केल्या प्रमाणे, त्यांचा विवाह नगरदेवळा ग्रामविस्तार अधिकारी संतोष लालचंद शिवनेकर (रा.कृषीनगर भडगाव रेाड पाचोरा) यांचा मुलगा सागर याच्याशी १७ ऑक्टोबर २०२० मध्ये झाला होता. लग्नात सासरच्यांच्या इच्छे प्रमाणे ७ लाख ७० हजार रुपयांची मागणी पुर्ण केली नाही म्हणुन विवाहीतेचा छळ सुरु होता. नवरदेव मनोरुग्ण असतांनाची माहिती लपवुन विवाह लावून देण्यात आल्याचे निदर्षनास आल्यावर, सासरच्या मंडळीचा त्रास वाढीस लागला. अखेर पिडीतेने घडला प्रकार पोलिस भावाला कळवले व त्रासाला कंटाळून पिडीतेने माहेर गाठले. कुटूंबीयांच्या अनेक बैठका होवुनही उपयोग झाला नाही. परिणामी साक्री पेालिस ठाण्यात पती सागर, सासरे सतोष, सासु मंगला, दिर योगेश ऊर्फ कोमल यांच्यासह विजय ब्राम्हणे, शिवलाला ब्राम्हणे, राधाबाई ब्राम्हणे (सर्व रा. पाचोरा कृषीनगर) यांच्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.