जळगाव ( प्रतिनिधी ) : काहीही एक कारण नसतांना शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याचे वाईट वाटल्याने कुंदन राजेंद्र कोळी (वय २१, रा. शेळगाव, ता. जळगाव) याला मेघशाम पाटील याने पावशी मारुन गंभीर जखमी केले. ही घटना दि. १० जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजता शेळगाव बस स्टॅण्डजवळील पानटपरी समोर घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील शेळगावजवळ कुंदन कोळी हा तरुण कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. दि. १० जानेवारी सायंकाळी साडेसात वाजता कुंदनचे वडील राजेंद्र कोळी हे बस स्टॅण्डजवळील पानटपरीजवळ उभे असतांना, गावातीलव मेघशाम पाटील हा दारुच्या नशेत त्यांना शिवीगाळ करीत होता. कुंदन कोळी याने त्याला जाब विचारल्याने त्याचे वाईट वाटून कुंदनवर धारदार पावशीने वार केले. यामध्ये त्याच्या हाताच्या पंजाला दुखापत झाली. दरम्यान कुंदन कोळी याने नशिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यानुसार मेघशाम पाटील (रा. शेळगाव, ता. जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ अनिल देशमुख हे करीत आहे.















