भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील दिपनगर औष्णीक विज केंद्रातील कामगार शनिवारी २० जुलै रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास कामावरून घरी वरणगावकडे दुचाकीवरून येत असताना कपील नगरजवळ समोरून आलेल्या दुसऱ्या दुचाकीची समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात तरूण झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. याबाबत वरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दादाराव नारायण जमधाडे (वय ३६, रा. मुळ मन्यारखेडा व ह.मु. वरणगाव,वामन गुरुजी नगर) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो दिपनगर औष्णीक विज केंद्रातील एका कंत्राटदाराकडे कामाला होता. २० रोजी कामावरून घरी जाण्यासाठी ते दुचाकी (एमएच १९ एएच ४७९३) ने वरणगाव येथे जाण्यासाठी निघाला. दरम्यान समोरून येणाऱ्या (एमएच १९ डीए ७९२६) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात या अपघातात दादाराव जमधाडे हा जमीनीवर कोसळल्याने डोक्याला व छातीला जबर मार लागला. त्याला वरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याबाबत वरणगाव पोलीस स्टेशनला दिपक नारायण जमधाडे यांच्या खबरी वरून भुसावळ येथील साजीद अहमद (पुर्ण नाव माहीत नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.