जळगाव (प्रतिनिधी) गोलाणी मार्केट येथील मायटी ब्रदर्स समोरून एका तरुणाची दुचाकी चोरू नेल्याची घटना 23 जुलै रोजी रात्री 8 वाजता समोर आली आहे. याप्रकरणी शुक्रवारी 26 जुलै रोजी दुपारी 2 वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
रमेश मंगेश मौर्य (वय 23 रा. हॅपी होम कॉलनी, जळगाव) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. तो गोलाणी मार्केट येथील परिसरात खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतो. नेहमीप्रमाणे 23 जुलै रोजी सकाळी 11 वाजता तो त्याची दुचाकी (एमएच 19 565) ने गोलाणी मार्केट येथील मायटी ब्रदर्स येथे आला होता. त्यावेळी त्याठिकाणी त्यांनी दुचाकी पार्क करून लावली. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली. रात्री 8 वाजता घरी जाण्यासाठी दुचाकी जवळ आला असता त्याला जागेवर दुचाकी मिळाली नाही. शोध घेऊन दुचाकी कुठेही मिळाली नसल्याने, त्याने शुक्रवारी 26 जुलै रोजी दुपारी 2 वाजता जळगाव शहर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सतीश पाटील हे करीत आहेत.