धरणगाव (प्रतिनिधी) कंडारी व भोणे फाटा शिवरस्ता अत्यंत खराब झाला असल्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांनी जि.प.सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांच्याकडे रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती. त्यानुसार पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जि.प.सदस्य प्रतापराव पाटील यांनी तात्काळ स्वखर्चाने जेसीबी उपलब्ध करून दिले आणि मुरूम टाकण्याची व्यवस्था केली.
यावेळी कंडारी येथील शिवसैनिक फारुख पटेल, सरपंच शकील पटेल, उपसरपंच दगा पटेल, युसुफ पटेल, वहिद पटेल, रेहमान पटेल, मुसा पटेल, रहीम पटेल, शाहरूख पेटल, फत्तु पटेल, तोसिफ शाह व साकरे येथील छोटू पाटील आदी उपस्थित होते.