TheClearNews.Com
Tuesday, May 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आठवडाभर दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी मिळावी ; जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाची मागणी

जिल्हाधिकारी, आयुक्तांना दिले निवेदन

The Clear News Desk by The Clear News Desk
September 29, 2020
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) गेल्या चार महिन्यांपेक्षा जास्त काळ दुकाने बंद असल्याने व्यापारी अजूनही आर्थिक संकटातून सावरलेले नाहीत. लॉकडाऊनमुळे आवक पूर्णपणे थांबलेली असतानाही दुकानाचे मेंटेनन्स, भाडे, लाईटबील, पगाराचा भार मात्र व्यापारी बांधवांनी सहन केला आहे. अनलॉक प्रक्रियेमध्ये सोमवार ते शुक्रवार ५ दिवस दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी मिळाल्याने व्यापाऱ्यांच्या जीवात जीव आला खरा, परंतु मार्केट अजूनही थंडावलेलेच आहे. एकूणच जळगावचे ‘व्यापार विश्व आर्थिक तणावात आहे. त्यामुळे सोमवार ते रविवार दुकाने सुरु करण्याची परवानगी जाहीर करावी तसेच दुकानांची वेळ वाढवावी, अशी मागणी जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळातर्फे करण्यात आली आहे.

 

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 मे 2026 !

जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन

जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाचे सचिव ललित बरडीया, कार्याध्यक्ष सुरेश चिरमाडे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.

अशा आहेत मागण्या

१) मार्केटसाठी पाचच दिवसांचा आठवडा असल्याने महिन्यात सुमारे ८ दिवस दुकाने बंद ठेवावी लागत आहेत. परंतु भाडे, मेंटेनन्स, सहकाऱ्यांचे पगार इत्यादी सर्व विषयांची पूर्तता एक महिन्याच्या हिशोबाने करावी लागत असल्याने प्रचंड आर्थिक ओढाताण सुरु आहे. शनिवार व रविवार या दोन्ही दिवशी सुद्धा दुकाने सुरु करण्याची परवानगी मिळाल्यास उत्पादन व विक्रीसाठी २५% अधिकचा कालावधी व्यापारी बांधवांना मिळेल व त्याची मदत आर्थिक ताण कमी करण्यासाठी व मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी नक्कीच होईल.

२) पितृपक्ष संपल्यावर सणासुदीच्या निमित्ताने ग्राहक खरेदीसाठी घराबाहेर पडतील. ७ दिवसांचा आठवडा झाल्यास ‘सोशल डिस्टंसिंग’ पाळणे व्यापारी बांधव आणि नागरिक सर्वासाठीच सोईचे होईल. कारण ५ दिवसांचा ताण ७ दिवसांमध्ये विभागला जाईल.
३) कोविड संदर्भात काळजी घेणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे, परंतु ज्यापद्धतीने मंदीची लाट आलेली आहे त्यातून निर्माण झालेल्या आर्थिक
संकटावर मात करणे हीसुद्धा तितकीच महत्वाची जबाबदारी आणि तार्किकदृष्ट्या योग्य पाऊल आहे. त्यासाठी मार्केट ही अत्यंत महत्वाची जागा आहे.

४) तसेच मार्केटवर अवलंबून असलेले हमाल, हात मजुरी करणारे कामगार, रिक्षाचालक, मालवाहक इत्यादी सर्वांनाच २ दिवस मार्केट बंद राहत असल्याने तडजोड करावी लागत आहे. शनिवार-रविवारला दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी मिळाल्यास हातावर पोट असलेल्या माणसांना रोजगार मिळेल.

 

अन्य शहरांप्रमाणे आपल्या जळगाव शहरातही शनिवार-रविवार दोन दिवस असलेली बंदी उठवून व्यापार सुरु ठेवण्याची परवानगी जाहीर करावी व जळगावच्या ढासळलेल्या अर्थव्यवस्थेला चालना द्यावी, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 मे 2026 !

May 12, 2026
क्रीडा

जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत योगेश धोंगडे चॅम्पियन

May 11, 2026
जळगाव

इयत्ता १० वी परीक्षेत आदित्य चौधरी यांचे यश

May 11, 2026
क्रीडा

बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

May 11, 2026
गुन्हे

सुप्रीम कॉलनीत घराचा कडीकोयंडा कापून चोरट्यांची हातसफाई

May 11, 2026
गुन्हे

टॉवर चौकातील उपाध्ये लॉजमधील कुंटणखाण्यावर छापा

May 11, 2026
Next Post

पाटचारीत पोहताना मृत्यु पावलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटूंबियांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव जिल्ह्यातील तरुणाची पाकिस्तानसाठी हेरगिरी ; मुंबई एटीएसकडून अटक !

December 14, 2023

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे जैन इरिगेशनचा गौरव

April 9, 2022

माजी जि.प.सदस्य प्रतापराव पाटील यांची धरणगावच्या भाजप कार्यालयास सदिच्छा भेट !

April 8, 2023

दिलासादायक : जिल्ह्यात आज आढळले अवघे १२ कोरोनाबाधित, ६३ झाले बरे !

July 1, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group