धरणगाव (प्रतिनिधी) केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकऱी वर्गामध्ये तीव्र संतापाची लाट आहे. कांदा उत्पादकांना याचा जबर फटका बसणार असल्याने केंद्राने तात्काळ कांदा निर्यात बंदी मागे घ्यावी, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी केली आहे. ते कांदा निर्यात बंदी विरोधात शिवसेनेने धरणगावात काढलेल्या मोर्चाप्रसंगी बोलत होते.
आज धरणगावात शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार विरोधात मोर्चा काढण्यात आला. मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून तर समारोप धरणगाव तहसीलदार कार्यालयात करण्यात आला. यावेळी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी केंद्र सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या. शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांनी आपल्या मनोगत शेतकरी विरोधी केंद्र सरकारचा निषेध केला. केंद्राने शेतकऱ्यांना तर न्याय दिलाच नाही. परंतु देशातील नामांकित कंपन्या देखील बंद केल्या.
आजच्या कोरोनाचा महामारीने कोरोडो विद्यार्थ्यांना बेरोजगार केले. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकऱी वर्गामध्ये मात्र तीव्र संतापाची लाट आहे. कांदा उत्पादकांना याचा जबर फटका बसणार आहे. या निर्णयाविरोधात धरणगाव तालुका शिवसेना आंदोलन पुकारले आहे. आता केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी मागे घेण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेने केली असल्याचे देखील श्री. वाघ म्हणाले.
केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने सरकारला दिलेला कांदा निर्यातबंदीचा प्रस्ताव हा कोरोनाच्या संकटकाळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा धक्कादायक निर्णय आहे. निर्यात बंदीमुळे बाजारातील कांद्याच्या वाढत्या किमतीं गडगडल्या आहेत. केंद्र सरकारने केलेली निर्यात बंदी ही शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारी आहे. तरी केंद्र सरकारने या निर्यात बंदीचा निर्णय तात्काळ मागे घेवून शेतकऱ्याना दिलासा द्यावा अशी मागणी शिवसेना करीत असल्याचेही श्री. वाघ म्हणाले.
महाराष्ट्रातील शेतकरी संघटना आणि महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कृषी मंत्री दादा भुसे, जळगावचे पालकमंत्री पाणीपुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील याबाबतीत गंभीर असुन केंद्र सरकारशी चर्चा करुन मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत आहे. या खात्याचे मंत्री ना.पियुष गोयल यांच्याकडे कांदा निर्यातबंदी हटविण्याची मागणी धरणगाव तालुका शिवसेना करीत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याला भाव मिळत असल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना चांगला दर मिळत आहे. या निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांना नुकसान होत आहे. तरी लवकरात लवकर निर्यात बंदी न उठवण्याच्या मागणीचे निवेदन धरणगाव तहसीलदार नितीन देवरे यांना देण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष निलेश चौधरी, उपजिल्हा प्रमुख पी.एम.पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. तसेच मागण्या मान्य न झाल्यास शिवसेना स्टाईलने अदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी दिला. यावेळी गुलाबराव वाघ.(शिवसेना जिल्हाप्रमुख) पि.एम.पाटील सर (शिवसेना उपजिल्हाप्रमुख) निलेश चौधरी (लोकनियुक्त नगराध्यक्ष) सुरेश नाना चौधरी. (माजी नगराध्यक्ष) नगरसेवक वासुदेव चौधरी,विजय महाजन ,सुरेश महाजन,भागवत चौधरी,जितेंद्र धनगर,अहमद पठाण.शिवसेना शहर संघटक धिरेंद्र पुरभे,शिवसेना उपशहर प्रमुख रवींद्र जाधव,दिपक पाटील युवासेना शहर प्रमुख संतोष महाजन,विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख विशाल महाजन, बाळू जाधव,पप्पू कंखरे,चेतन जाधव,लक्ष्मण महाजन,राहुल रोकडे,कमलेश बोरसे,भीमा धनगर,हेमंत चौधरी,नारायण महाजन,परमेश्वर माळी,छोटू जाधव,बंटी महाजन,नारायण महाजन.शिवसेना कार्यालय प्रमुख विनोद रोकडे,परेश चौधरी गोपाल चौधरी,अरविंद चौधरी तसेच गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते.