मुक्ताईनगर (प्रतिनिधी) तालुक्यातील कुऱ्हा येथील एका दुकानदाराची सुमारे १२ लाख ३७ हजार १३६ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुजरातच्या एका व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, कुऱ्हा गावात योगेश राधेशाम चौधरी (वय ३०, रा. कुऱ्हा ता. मुक्ताईनगर) यांचे गावात योगेश ट्रेडर्स नावाचे दुकान आहे. गुजरातचा व्यापारी दिनेश शहा पूर्ण नाव माहित नाही (रा. अहमदनगर, गुजरात) याने दि. ३१ जानेवारी २०२० व १ फेब्रुवारी २०२२ रोजी योगेश चौधरी यांच्या योगेश ट्रेडर्सवर वरुन सुमारे १२,३७,१३६ /- रुपये किमतीचा मका खरेदी करुन त्याच्या अहमदाबाद मधील गोडावूनमध्ये खाली केला. तसेच खाली केल्याची पोच पावती देऊन दोन दिवसात पैसे मिळुन जातील असे सांगितले. दोन दिवसांनी व्हाट्सअप क्र ९८२४०५३५४२ वरुन योगेश चौधरी यांच्या व्हाट्सअप नंबरवर शहा याने आपल्या खात्यातील पैसे डेबीट केल्याचे सांगितले. परंतू चौधरी यांच्या खात्यावर पैसे आलेच नाही. यामुळे एजंट दिनेश शहा याने मका घेवून जावुन दिलेल्या पत्यावर माल न उतरविता ईतर ठिकाणी माल उतरवुन आपली फसवणुक केल्याचे लक्षात येताच श्री. चौधरी यांनी एजंट शहाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पो.उप निरी. राहुल बोरकर हे करीत आहेत.