चाळीसगाव (प्रतिनिधी) येथील तहसील कार्यालयातील लिपीकाला पंटरसह वारसाचे नाव कमी करण्यासाठी ११ हजार रूपयांची लाच घेतांना रंगेहात अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे चाळीसगाव महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
बहीणीच्या नावे असलेल्या शेतजमिनीच्या उतार्यावरील वारसाचे नाव कमी करण्याच्या मोबदल्यात प्रशांत किसन सावकारे, (लिपीक टंकलेखक, तहसिल कार्यालय) याने तक्रारदाराकडून ११ हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. परंतू तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी अँटी करप्शनकडे तक्रार केली.त्यानुसार आज अँटी करप्शनच्या पथकाने आज प्रशांत किसन सावकारे व त्याचा पंटर यादव केशव पवार (रा:- भोजे ,ता.पाचोरा) असं दोघांना ११ हजारांची लाच घेतांना अटक केली. यावेळी अँटी करप्शनचे डीवायएसपी गोपाल ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश लोधी, सफौ.रविंद्र माळी,पोहेकॉ.अशोक अहीरे, पोहेकॉ.सुनिल पाटील, पोहेकॉ.सुरेश पाटील, पोना.सुनिल शिरसाठ, पोना.मनोज जोशी, पोकॉ.प्रविण पाटील, पोकॉ.नासिर देशमुख, पोकॉ.ईश्वर धनगर. यांचे पथक कारवाईसाठी आले होते.