TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावातील वादग्रस्त अतिक्रमण हटविले ; शहरात शुक्रवार सकाळपर्यंत कर्फ्यू !

जाणून घ्या...प्रांताधिकाऱ्यांनी नेमकं काय म्हटलंय आदेशात !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 2, 2022
in गुन्हे, जिल्हा प्रशासन, धरणगाव, सामाजिक
1
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरालगत असलेल्या गट नं. १२४८/२ मधील वादग्रस्त अतिक्रण आज मोठ्या बंदोबस्तात शांततेत काढण्यात आले. दरम्यान, आज रात्री आठ वाजेपासून तर शुक्रवार सकाळी ८ वाजेपर्यंत कर्फ्यू लावण्यात आलेला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. याबाबतचे आदेश प्रांतअधिकारी विनय गोसावी यांनी काढले आहेत.

गायरान बचाव मंचच्या वतीने धरणगाव येथील गट क्र १२४८ व गट नं १२४८/९ या गायरानासाठी आरक्षित शासकिय जागेवर मानवसेवा संकल्प प्रतिष्ठाण, मुंबई यांनी केलेले अतिक्रमण काढण्यात यावेत, अशी तक्रार केली होती. त्यावर जळगाव जिल्हाधिकारी यांनी तात्काळ अतिक्रमण काढण्याबाबतचे आदेश काढले होते. त्यानंतर हेच आदेश नाशिक आयुक्तांनी कायम ठेवले होते. त्यामुळे आज सकाळी धरणगाव पोलिसांनी शांतता कमेटीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत शहरातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते. यावेळी पोलीस अधिकारी तथा महसूलच्या अधिकाऱ्यांनी गावात सामाजिक एकोपा जपण्याचे आवाहन केले. तसेच वादग्रस्त परिसरात कलम १४४ लागू केले असल्याचे जाहीर केले. तसेच संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया समजावून सांगितली. धरणगावकरांनी घेतली सामंजस्याची भूमिका घेतल्यामुळे त्याच ठिकाणी वातारवण निवळले होते. परंतू खबरदारी म्हणून सायंकाळी संपूर्ण शहरात दोन दिवसा साठी कर्फ्यू अर्थात संचारबंदी लावण्यात आली. याबाबतचे आदेश प्रांतअधिकारी विनय गोसावी यांनी काढले आहेत.

READ ALSO

बंद घर फोडून पावणे दोन लाखांचे दागिने लंपास

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 ऑक्टोबर 2026 !

शहरातील मुख्य भागात कडक बंदोबस्त !
शहरातील मुख्य भागात पोलिसांनी कडक बंदोबस्त लावला होता. त्यात १०० पोलीस कर्मचारी, २० महिला कर्मचारी, ४ आरसीपी प्लाटून, १० पोलीस अधिकारी आणि २ डीवायएसपी दर्जाचे अधिकारी यांचा समावेश होता. दरम्यान, अतिक्रमण काढण्याच्या कारवाईचा गावात कुठेही तणाव जाणवला नाही. सर्वत्र पोलिसांचा कडक बंदोबस्त होता.

संवेदनशील विषयाची धरणगाव पोलिसांकडून उत्कृष्ट हाताळणी !
अतिक्रमण हटविण्याबाबत गावात काही दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चा सुरु होत्या. जिल्हाधिकारी अमन मित्तल, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी धरणगावला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला होता. प्रांतअधिकारी विनय गोसावी, चाळीसगाव विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी ऋषिकेश रावले, पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी संवेदनशील विषयाची उत्कृष्ट हाताळणी केल्यामुळे गावात सगळीकडे शांतता होती.

जाणून घ्या…नेमकं काय म्हटलंय आदेशात

विनय गोसावी, उपविभागीय दंडाधिकारी, एंरडोल भाग एरंडोल, यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 (1) (2) (3) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून त्यांनी संपुर्ण धरणगांव शहरात दिनांक 02/11/2022 चे रात्री 08.00 वाजेपासुन दिनांक 04/11/2022 चे सकाळी 8 वाजेपावेतो संचारबंदी लागू करण्याचा आदेश पारित केला आहे. सदर बाबीचे गांभीर्य लक्षात घेता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्याचे गांभीर्य लक्षात घेता वेळेअभावी सदरचा आदेश एकतर्फी लागु करण्यात येत आहे. सदर आदेश हा अत्यावश्यक सेवा जसे रूग्णसेवा, पाणी पुरवठा, आरोग्य, सार्वजनिक वितरण व्यवस्था. अंत्यविधी तसेच शासकिय कर्तव्यावर हजर शासकीय अधिकारी / कर्मचारी, धरणगाव शहरातून जानारे मुख्य रस्त्यावरुन वाहतुक तसेच पोलीस अधिकारी व बंदोबस्तातील कर्मचारी यांना लागु राहणार नाही.

गावासह सोशल मीडियातही आवाहन

प्रशासनाने संचारबंदी लागू केल्यानंतर सोशल मीडियात आदेशाची प्रत व्हायरल करण्यात आली आहे. तसेच एक ऑडीओ क्लिप देखील टाकण्यात आली आहे. दरम्यान, अफवा पसरविणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा ईशारा देखील पोलिसांकडून देण्यात आला आहे. दरम्यान, गावात संचारबंदी बाबत दवंडी देखील देण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बंद घर फोडून पावणे दोन लाखांचे दागिने लंपास

October 15, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 ऑक्टोबर 2026 !

October 15, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

October 14, 2026
गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 ऑक्टोबर 2026 !

October 14, 2026
Next Post

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, गुरुवार ३ नोव्हेंबर २०२२ !

Comments 1

  1. दिनेश जे. वाघ says:
    4 years ago

    संजय राऊतला अजिबात जामीन मिळू नये. अशा भ्रष्टाचारी लोकांना जामीन मिळाल्या मुळे जनमाणसात कायद्या बाबत चुकीचा भ्रम पसरतो. म्हणूनचं लोक अंंधा कानुन है म्हणतात..
    संजय राऊत ने अति केले होते. भारतीय केंद्रीय तपास यंत्रणावर गंभीर आरोप केलेले आहेत.

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अफगाणिस्तानातील भारतीयांना लवकरचं देशात आणले जाईल ; परराष्ट्रमंत्र्याची माहिती

August 17, 2021

महिला रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ‘मेरी सहेली’ अभियान !

October 24, 2020

सीए फाउंडशेन परीक्षेत चेतन चौधरीचे सुयश !

September 15, 2021

खळबळजनक : भुसावळसह अमळनेरात पूर्व वैमनस्यातून दोन तरुणांचा खून !

October 1, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group