जळगाव (प्रतिनिधी) कोरोनामुळे मृत्यू झालेल्या धरणगाव येथील पत्रकार शरद कुमार बन्सी यांच्या परिवाराला शासनाने ५० लाख रुपयाची मदत करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचे जिल्हाध्यक्ष तथा उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे इमेलद्वारे निवेदन देऊन केली आहे.
धरणगाव येथील लोकमतचे पत्रकार शरद बन्सी हे कोरोना काळात जीवाची पर्वा न करता वृत्तांकन करत होते. म्हणूनच त्यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानित देखील करण्यात आले होते. त्यामुळे पत्रकार शरद बन्सी यांच्या परिवाराला शासनाने ५०लाखाची मदत मिळावी म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, राज्य संघटक संजय भोकरे हे पाठपुरावा करणार आहेत, असे प्रविण सपकाळे यांनी कळविले आहे. निवेदनकर्ते म्हणून खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, जिल्हा कार्यध्यक्ष शरद कुलकर्णी, जिल्हा संघटक भगवान मराठे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रदीप गायके, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख मिलिंद लोखंडे, नरेश बागडे, दिपक सपकाळे, प्रमोद सोनवणे,भूषण महाजन, मुकेश जोशी, रितेश माळी, संजय तांबे, सुनील भोळे,बाळू वाघ व जळगाव जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधव यांनी मागणी केली आहे.















