बोदवड (प्रतिनिधी) बोदवड ते जामनेर रोडवर शेलवड शिवारात सुर नदीच्या पुलाच्या अलीकडे एकाला मारहाण करून त्यांच्याकडील पैसे आणि इतर ऐवज लुटून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी बोदवड पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, घनश्याम उर्फ बाळा सुभाष सोनार (रा.अर्जुनवाडी, जामनेर) हे १८ जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास बोदवड ते जामनेर रोडवर शेलवड शिवारात सुर नदीच्या पुलाच्या अलीकडे अज्ञात लुटारूंनी बाळा सोनार यांच्या दुचाकीला अडवून त्यांना खाली पाडून लाथा बुक्क्यांनी, तोंडावर, पाठीवर, पोटावर मारहान करुन त्यांच्या खिशातील पाकिटातील ११ हजार ३०० रुपये बळजबरीने हिसकावून घेतले. तसेच दुचाकीला लावलेली १४ हजार रुपये किंमतीची स्पेअर पार्टचा सामान असलेली पिशवी घेऊन पळ काढला. या प्रकरणी अज्ञात दोन लुटारूंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि अंकुश जाधव हे करीत आहेत.
















