जळगाव (प्रतिनिधी) दूध संघातील अपहारप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात आज सकाळी पोलिसांनी चंद्रकांत मोतीराम पाटील उर्फ सी.एम. पाटील (जळगाव) याला शहर पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्यातील ही सहावी अटक आहे.
दूध संघातील अपहारप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात कार्यकारी संचालक मनोज लिमये यांच्यासह यांच्यासह हरी रामू पाटील, किशोर काशिनाथ पाटील आणि अनिल हरिशंकर अग्रवाल यांना अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. तर पाचवा संशयित आरोपी रवी मदनलाल अग्रवाल (रा. अकोला) याला देखील पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी अटक केली होती. त्यानंतर आज सकाळी चंद्रकांत मोतीराम पाटील उर्फ सी.एम. पाटील (जळगाव) याला शहर पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्यातील ही सहावी अटक असून आणखी काही संशयित रडारवर असल्याचे कळते. दरम्यान, रवी अग्रवाल आणि सी.एम. पाटील या दोघांना दुपारून न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे. अयोध्या नगरमधून संशयित सी.एम.पाटील याला सपोनि परदेशी आणि रवि पाटील यांनी ताब्यात घेण्याची कारवाई केली.















